लागिरं झालं जी मालिका वाद
लागिरं झालं जी ही मालिका सध्या टीआरपी च्या बाबतीत महाराष्ट्रात सर्वोच्च स्थानावर असणारी मालिका आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून प्रेम दिले आहे. परंतु काही दिवसांपूर्वी मालिकेतील निगेटिव्ह भूमिका असणाऱ्या मामी व जयडी ही पात्रे साकारणाऱ्या दोघींनी मालिका सोडल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले होते. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
ही मालिका दोघींनी का सोडली हे लोकांना समजले नाही? ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतून जयडी आणि मामी यांनी घेतलेली एक्झीट सर्वांच्याच जिव्हारी लागली आहे. ‘लागिरं झालं जी…’मध्ये विद्या सावळे (मामी) आणि किरण ढाणे (जयडी) यांच्या नकारात्मक भूमिकेला लोकांनी डोक्यावर घेतले होते. त्यांनी अचानक मालिका सोडायचा निर्णय घेतल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती, काहींनी पैशासाठी हे केले असे म्हणत त्यांच्यावर नाराज झाले. परंतु मामी आणि जयडीने ‘लागिरं झालं जी’ मालिका का सोडली याचे खरे कारण समोर आले आहे. त्यांनी ABP माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खरे कारण उघड केले आहे.
लागिरं झालं जी मामी जयडी संपूर्ण मुलाखत:
जयडी आणि मामी यांनी मानधनामुळे या मालिकेला रामराम ठोकला असल्याच्या चर्चेत तथ्य असले तरीही त्यांना मिळणारे मानधन हे अल्प होते असे मामी म्हणजेच विद्या सावळे यांनीच हे उघड केले आहे. ‘मालिकेमध्ये सर्वाधिक मानधन अर्थात अजिंक्य आणि शितल या पात्राला मिळतात. त्यामानाने इतर कलाकारांना खूपच कमी मानधन मिळत असून आम्हाला अन्य कलाकारांपेक्षाही कमी मानधन मिळाले असा खुलासा त्यांनी केला. मानधन मनासारखे मिळत नसल्यामुळे अनेक वेळा आम्ही प्रोडक्शन हाऊसबरोबर चर्चाही केली. मात्र तरीदेखील मानधनात वाढ करण्यात आली नाही. तसेच अनेक वेळा अतिरिक्त केलेल्या कामाचा मोबदलाही आम्हाला मिळाला नाही, असे विद्या म्हणाल्या.
प्रत्येकाला गरजा असतात आणि कमीत कमी त्या पूर्ण झाल्या पाहिजेत एवढे मानधन तरी हवे. कलाकारालाही स्वत:ची काही तत्व असतात. तो त्यांना सांभाळून काम करत असतो, असेही विद्या म्हणाल्या. मालिका सोडल्यावर चाहत्यांचे प्रेम किती होते याची प्रचिती आली. सोशल मीडियावरून आलेल्या प्रतिक्रीयांतून कळते की चाहते आम्हाला मिस करत आहेत, असे किरणने सांगितले. आगामी काळात मिळणाऱ्या भूमिकांवर लक्ष देऊन इथून पुढे मिळणाऱ्या कामात चाहत्यांच्या अपेक्षा पुर्ण करू, असेही ती म्हणाली.
प्रोडक्शन हाऊस मानधनाविषयी तडजोड करण्यास तयार नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. तरीही शेवटी त्यांनी सांगितले की आमचा वाद प्रोडक्शन हाऊस बरोबर असून मालिकेवर नाही, यामुळेच नव्या मामी आणि जयडीवरही तितकेच प्रेम करा, असे त्या दोघीही म्हणाल्या.
लागिरं झालं जी कलाकार मानधन:
सूत्रांच्या माहितीनुसार मामी आणि जयडी यांना 2017 ला प्रत्येक एपिसोड साठी 6000 ₹ मिळत होते. त्याच्या मानाने मालिकेच्या मुख्य भूमिका साकारणाऱ्या अजिंक्य आणि शीतल ला प्रत्येकी 15000 ₹ मिळत होते. परंतु 2018 यावर्षी ते वाढवून 25000₹ पर्यंत मिळत होते. तरीही जयडी आणि मामी यांची भूमिका साकारणाऱ्या विद्या सावळे आणि किरण ढाणे यांना मानधनात जास्त वाढ दिली गेली नव्हती.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
लागीरं झालं जी मालिकेतील शिवानी बावकर म्हणजेच शितली ला एका दिवसाचे मिळते एवढे मानधन