अवघ्या महाराष्ट्रात विनोदाचा बादशहा म्हणून प्रसिद्ध असलेला आपला सर्वांचा लाडका अभिनेता लक्ष्या उर्फ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जयंतीनिमित्त अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक महेश कोठारे आणि हास्यसम्राट लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या धुमधडाका चित्रपटावेळी झालेल्या किस्सा विषयी सांगणार आहोत.

थोडे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी
- जन्म: २६ ऑक्टोबर १९५४ मुंबई
- मृत्यू: १६ डिसेंबर २००४ मुंबई
- पत्नी: रुही बेर्डे, प्रिया बेर्डे
- मुले: अभिनय बेर्डे, स्वानंदी बेर्डे
लक्ष्याने साकारलेल्या भूमिका प्रत्येक रसिकाच्या मनात आजही घर करून कायम आहेत. महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीने अनेक प्रसिद्ध चित्रपट दिले. मरगळ आलेल्या सिनेसृष्टीला पुन्हा लोकप्रिय बनवले. आम्ही आपणांस धूमधडाका चित्रपटासाठी लक्ष्या ने किती पैसे घेतले होते हा किस्सा सांगणार आहोत.

लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे धुमधडाका किस्सा
झाले असे होते की महेश कोठारे हे “प्यार किये जा” या हिंदी चित्रपटाचा मराठीत रिमेक बनवण्याच्या तयारीत होते. या चित्रपटासाठी मेहमूद सारख्या हरहुन्नरी कलाकारासारखा पात्र त्यांना मिळत नव्हता. त्यावेळी महेश कोठारेंच्या आई आणि वडिलांचं नाटक सुरु होते. “झोपी गेलेला जागा झाला” नाटकातील कलाकार बबन प्रभुणे यांचे निधन झाले आणि त्याजागी अभिनेता लक्ष्मीकांत यांना संधी देण्यात आली.

महेश कोठारे यांना लक्ष्याचे नाटकातील काम खूप आवडले आणि महेशला आपला लक्ष्या सापडला. महेश कोठारे आपला पहिलाच चित्रपट दिग्दर्शन करत होते, चित्रपटासाठी त्यांच्याकडे फारसे पैसेही नव्हते. त्यांनी धुमधडाका चित्रपटातील पात्रासाठी लक्ष्याशी शी बोलले आणि खिशातून एक रुपया काढून लक्ष्मीकांत यांना चित्रपटासाठी निश्चित केले.
लक्ष्याने सुद्धा फक्त एका रुपयातच हा चित्रपट केला. धुमधडाका या चित्रपटामधून लक्ष्याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता तर मिळालीच त्याबरोबर महेश ला लक्ष्या मिळाला. या जोडीने पुन्हा एकत्र येत झपाटलेला, माझा छकुला, धांगडधिंगा, पछाडलेला अशा प्रसिद्ध चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीला जीवदान दिले. लोक पुन्हा एकदा चित्रपटाकडे वळायला लागले.
तर हा होता लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांचा धुमधडाका किस्सा, आपणांस कसा वाटला आम्हास नक्की कळवा.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.