लास वेगासमध्ये सुरू असलेल्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये तीन अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात ५० ठार झाले असून २०० जण जखमी झाले आहेत. त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांच्या कारवाईत एक हल्लेखोर ठार झाला आहे.
लास वेगास येथील मांडले बे हॉटेल आणि कॅसिनो परिसरात म्युझिक कॉन्सर्ट सुरू होती. त्याचवेळी हॉटेलमधून अचानक गोळीबार सुरू झाल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिली. हल्लेखोरांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली असून एकजण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. या गोळीबारामध्ये दहशतवादी हल्ला आहे की अन्य कारण आहे याचाही तपास केला जाणार असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.
Terrifying. #lasvegas pic.twitter.com/zi5eELetLm
— Matt Bevan ? (@MatthewBevan) October 2, 2017
स्थानिक वेळेनुसार रात्री 10 वाजता गोळीबाराला सुरुवात झाली. या कॅसिनोमध्ये कंट्री म्युझिक फेस्टिव्हल सुरु होता. त्याचवेळी हल्लेखोर घुसले आणि मशीनगनमधून त्याने गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, गायक जेसोन एल्डिनचा परफॉर्मन्स सुरु असताना गोळीबार झाला.
यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. एका शूटरला कंठस्नान घातल्याची माहिती लास वेगास पोलिसांनी ट्विटरवर दिली आहे. याशिवाय कोणीही घटनास्थळी न जाण्याचं आवाहनही केली आहे. तसंच बंदूकधाऱ्यांच्या शोधासाठी स्वॉट पथक दाखल झालं आहे.
मॅकरेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या विमानं वळवण्यात आली आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.
भयानक व्हिडीओ :
#LasVegas where 50 killed and more than 200 injured…pic.twitter.com/BnIujS49Lq
— Ajay sharma (@Ajay9307075397) October 2, 2017
शेवटचा अपडेट :
– हॉटेल च्या ३२ व्या मजल्यावरून फायर करीत होता बंदुकधारी
– हल्लेखोर जाग्यावर ठार .