मराठा आरक्षण स्थगिती वरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

0
मराठा आरक्षण स्थगिती वरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Share

मराठा आरक्षण स्थगिती मिळाल्याने व्यथित झालेल्या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. लातूर जिल्ह्यातील बोरगाव येथील 25 वर्षीय तरुणाने औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

किशोर कदम असे तरुणाचे नाव असून मराठा आरक्षण स्थगिती मिळाल्याने तो नाराज असल्याचे वृत्त आहे.

सकाळी सकाळी चाकूर तहसील कार्यालयासमोर येऊन त्याने सर्वांसमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. किशोर कदम हा तरुण एमपीएससी परीक्षा तयारी करत होता. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने नाराज होत त्याने हे पाऊल उचलले आहे. सध्या त्याच्यावर लातूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असून त्याच्या तब्येतीबाबत अजून कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस आहे. देशात मागील वर्षात 1 लाख 39 हजार 123 जणांनी आत्महत्या केली. आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात पहिल्या क्रमांकावर आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.