पुणे:
लवासा म्हणजे पुण्याच्या सौंदर्यातील एक हिराच, पण सरकारने लवासा चा विशेष नियोजन प्राधिकरण दर्जा रद्द केल्यानंतर तेथील काम रखडले गेले. परंतु लवासाचे सौंदर्य पाहण्यासाठी पुण्यातून उत्तुंग गर्दी ही कायमचीच. सर्व पुणेकरांचे आवडते ठिकाण मध्ये लवासा येतेच.
पण गेले काही दिवस झाले गर्दीचे कारण देत लवासा कॉर्पोरेशन ने येणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश फी आणि पार्किंग व्यवस्था यासाठी छोट्या गाड्या २००₹ आणि ४ चाकी साठी ५००₹ असे पैसे उकळायला सुरुवात केली होती.
काही जणांकडून १०००₹ पर्यंत पार्किंग साठी घेतल्याच्या तक्रारी सुद्धा आल्या होत्या.
लवासा ला असे शुल्क आकारणे नियमबाह्य असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) ने लवासा कॉर्पोरेशन ला नोटीस देत प्रवेश शुल्क रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.याबाबतीत १५ दिवसात खुलासा करण्याचे आदेश पीएमआरडीए ने लवासा कॉर्पोरेशन ला दिले आहेत.
एवढी अवाढव्य रक्कम पाहून पुणेकरांचा संताप अनावर झाल्याच्या घटना सुद्धा घडल्या असून नाईलाजास्तव शुल्क भरावे लागल्याचे पर्यटक सांगतात.
आपणास या नियमबाह्य शुल्क आकारणीबद्दल काय वाटते आम्हाला नक्की कळवा.