प्रिये: एक प्रेम पत्र | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

0
प्रिये: एक प्रेम पत्र | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

प्रिये,
*** आज पण तुझ नाव नाही लिहिणार मी, जगाला कळेल कि तु कोण आहेस.

तुला कुणावर प्रेम झालंय का? असेल झाल तर सांग कारण मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो. रोजच्या घडणाऱ्या गोष्टी तुला मी माझ्या मनातून सांगत असतो. लोकांशी माझ नात काहीच नाही. बस!!! तुझ आणि माझ काहीतरी नात जुळणार असाव म्हणून मला तुझ्यावरच प्रेम झाल. तुला चित्रकार, कवी, लेखक असे गुण असलेला कलाकार तुला जोडीदार म्हणून आवडेल का ग?

मी प्रत्येक चित्र काढली कि खाली सही करतो पण सही माझी असली तरी ते नाव तुझ असत. लोक जेव्हा माझ्याकड बघतात तेव्हा वेडा आहे मी असच मानून बघतात. माझ चित्र असल तरी ते तुझ्यानावे होऊन जात. प्रत्येक गोष्ट मी कुणाला सांगू शकत नाही. फक्त तुझी मी आठवण काढतो आणि कविता तयार करतो तुझ्यावरती. काहीसा असा आहे मी “वेडा चित्रकार”. तुझ्यामुळ झालेला आणि तुझ्याचसाठी बनलेला. कधी आपण एकत्र आलो तर आवडेन का तुला मी असा?

तुला तिथ रोज उचक्या लागत असतील. तुला त्याच कारण माहित नसेल पण मला माफ कर *** कारण मी श्वास घेण विसरेन पण तुला मी एक क्षण विसरू शकत नाही. आणि म्हणूनच तुला तिकड उचक्या लागतात. अशी तुझी रोज आणि सारखी आठवण काढून मी तुला त्रास देतो. आणि तरीही तुला आवडेन का?

रोज त्या पायारीवरती मी येऊन बसतो तुला बघतो.तुझ चित्र काढतो. तुला ते रोजचच आहे. पण एक दिवस मी आलो नाहीतर तुला मी आठवतो का?

लेखक: Artista Ajinkya Bhosale
संपर्क: 7558356426

©PuneriSpeaks

कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणाऱ्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

मैत्रीण

रहस्य शिवाजी महाराज यांच्या बेमतलब मृत्यूचं

शंका-कुशंका: लग्नानंतरची पहिली रात्र

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.