सेर-वाजी (शिवाजी): शिवरायांना एक पत्र
प्रिय ? म्हणू का काय म्हणू ?
श्री.श्री.श्री.छ. शिवाजी शहाजी राजेभोसले. यांस ,
काय होणारे ? काल गोव्यातून तुमचा पुतळा हलवला उद्या दिल्लीतून हटवतील. मग रस्त्यांवरच्या पुतळ्यासोबत रस्त्याला पुलांना दिलेली नाव हटवतील. मग अस करत करत प्रत्येक मराठी घरात लावलेली तुमच्या राज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा काढून टाकतील. आणि नंतर आमच्या मनातून तुमच नाव अगदी सहज काढून टाकतील. ते शक्य नाही पण अशक्य हि म्हणता येत नाही महाराज.
जातीय तेढ निर्माण झालीय इतकी कि ब्राम्हण, मराठा महार, माळी, धनगर यात उतरू पाहत आहे. आणि महाराज मला सांगा प्रत्येकाचे विचार सारखे असतात का? मराठा काय बोलला तर महार म्हणतात आमच्या पूर्वजांनी मदत केली म्हणून शिवाजी राजे झाले. मग त्याला उत्तर देत मराठा बोलतो काही असेना का पण राजे आमचेच होते न मराठ्यांचे. तो वाद निवळला कि ह्या दोन्ही जाती ‘जय शिवराय, जय भीमराय’ चा नारा देत ब्राम्हण समाजावर आपला जुना राग काढत हजारो वर्षापासून ते आत्ताच्या सत्ताधारी कार्यप्रणाली पर्यंत बोलू लागतो.
यात नेमक महाराज आम्ही तुम्हाला विसरतो. तुमची तुलना होते. वाढदिवसाच्या बोर्डवर असलेल्या भाऊ दादाच्या फोटो पेक्षा तुमचा फोटो छोटा असतो. पेपर मध्ये काही बातमी आली तर राजकारण्यांच्या यादीत तुमचा फोटो छापला जातो तो हि शेवटी. तुमची तुलना होते मुस्लीम सरदारांशी घटना लिहिलेल्या लेखक आंबेडकरांशी तुलना होते तुमची शिवाजी आणि छत्रपती या नावाची.
सोयी नुसार तुमचे वाढदिवस साजरे करताना आम्हाला आनंद होतो कि तुमच्यासाठी दोन दिवस आहेत. पण १९ फेब्रुवारी सोडली तर तिथीनुसार शिवजयंतीला जो काय जातीय हल्लाबोल होतो तो मात्र बघवत नाही.
तुमच्या कार्याची तुलना होते या पुढे अजून काय बोलणार. जिथ तुलना होते तिथ साहजिकच तुमच्या कार्याबद्दल लोकांच्यात आता संभ्रम निर्माण झालाय अस मला वाटत. म्हणजे शिवरायांनी अफजुल खानला मारलं. शायीस्तेखानाची बोट कापली. आणि जितक शिवाजी राजांनी कुणाला मारून पाप केल याहून कैक पट त्यांनी रयतेसाठी पुण्यकर्म केल हेच नेमक लोक विसरली. विसरत चालली आहेत. शिवाजी राजाचा इतिहास खरा कि खोटा या विचारात असताना काल मला तुमच्या नावाचा एक फेसबुक ग्रुप दिसला त्यावर एक पोस्ट होती कि “शिवाजी महाराजांचा खरा इतिहास असलेल्या पुस्तकांची पी.डी.एफ.असेल तर पाठवा.” म्हणजे जो इतिहास मिळवून तुम्ही पुढ होणाऱ्या जातीय वादात किंवा दंगलीत त्या वाचलेल्या इतिहासाचा उपयोग करणार असाल तर मग हि असली निनावी पुस्तक हवीच कशाला?
वाईट वाटत तुमची तुलना होते. जाणूनबुजून आणि आम्ही काय करतो बघतो आणि सोडून देतो. अगदीच आवाज उठवला तर कायदा व्यवस्थेला भितो. कारण मराठा उपेक्षितच आहे संभाजी महाराज गेल्यापासून. पण लोकानी आणि सरकार ने मात्र गैरसमज करून ठेवला कि शिवाजी हा मराठ्यांचा राजा होता आणि म्हणून मराठ्यांना कसले हक्क द्यायचे नाही, का तर त्याच्या राजाने आमच्यावर जुलूम केला? मी तर म्हणतो महाराज तुम्ही उगीच जन्माला आला. तुमचा अपमान होण्या ऐवजी आज आम्ही बसलो असतो इराकी इराणी राजाच्या मशिदीत किंवा इंग्रजांच्या चर्च मध्ये तेव्हा कळाली असती आम्हाला तुमची किंमत.
पण असो देवळातला देव माणणारे खूप लोक आहेत. असा देव ज्याला कोणी बघितल नाही. ज्यान कुणाच भल केल नाही. पण तुम्ही रक्ताच पाणी करून रयतेला जपलं सांभाळलं, स्वातंत्र्य दिले आणि हे इतिहासात नमूदही आहे, अस सगळ असताना ही तुम्हाला मानणारी लोक फक्त मराठाच आहेत..
शिवाजी जन्माला यावा पण…मला वाटतय नको आता शिवाजी नको जन्माला यायला. कारण तुमची किंमत कुणाला नाही आणि येऊन काय करणार तुम्ही.
माफी असावी राजे पण रडू येत तुमचा अपमान होताना बघून.
तुमचाच
(मावळा न म्हणायच्या लायक)
अजिंक्य.
लेखक: Artista Ajinkya Bhosale
संपर्क: 7558356426
©PuneriSpeaks
कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.
दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणाऱ्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.