मराठा समाजातील तरुणांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार

3
मराठा समाजातील तरुणांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार

शून्य व्याजदरावर कर्ज देण्याचा निर्णय घेऊन सरकारने खास दिवाळी भेट दिलीये.

मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगारांसाठी शून्य व्याजदरावर कर्ज मिळणार आहे.

दहा लाख रुपयापर्यंतचे कर्ज बँकेमार्फत घेतल्यास त्यावरील व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. तसंच कर्जाची मर्यादा 50 लाखापर्यंत असणार आहे.

राज्य सरकारने मराठा समाजाला मोठा दिलासा दिलाय. मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगारांसाठी शून्य व्याजदरावर कर्ज देण्याचा निर्णय घेऊन सरकारने खास दिवाळी भेट दिलीये, असे म्हणता येईल.

मराठा क्रांती मोर्चानंतर राज्य सरकारने दखल घेत अनेक मागण्यांचं आश्वसानं दिलं होतं. मराठा आरक्षणाचा निर्णय अद्याप न्यायालयात आहे. दरम्यान आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय.

मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानूसार स्थापन झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीने हा निर्णय घेतलाय. त्यामुळे मराठा समाजातील तरुणाचा व्यवसायासाठी मोठा दिलासा मिळालाय.

कशा पद्धतीने कर्ज मिळणार व त्यासाठी काय प्रोसेस असेल असे काही अजून तरी घोषित केले नाहीये.

News source

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.