Lockdown 5.0: काय काय सुरु होणार, काय राहणार बंद

0
Lockdown 5.0: काय काय सुरु होणार, काय राहणार बंद
Spread the love

Lockdown 5.0 ची घोषणा केंद्र सरकारने केली असून यात काय काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार याबाबतची नियमावली प्रसिद्ध केली आहे. केंद्र सरकारने पाचव्या टप्प्यातील या लॉकडाउन ला ‘अनलॉक-1’ असे नाव दिले आहे. या लॉकडाऊन मध्ये काही अनेक निर्बंध हटवले जाणार असून त्यानुसार आठ जूनपासून धार्मिक स्थळे, शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट फेज मध्ये उघडणार आहेत.

Lockdown 5.0 काय सुरु होणार

Lockdown 5.0 मध्ये टप्याटप्याने सुविधा सुरु होणार आहेत. यात ३ टप्प्यात सर्व सुविधा सुरु होणार असून राज्याला परिस्थितीनुसार निर्बंध लावण्याचे विशेष अधिकार दिले गेले आहेत.

Unlock 1.0 पहिला टप्पा

8 जूनपासून पहिल्या टप्प्यात धार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट उघडणार आहे. यासाठीची नियमावली आरोग्य मंत्रालया जारी करणार आहे. त्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

Unlock 1.0 दुसरा टप्पा

यात शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, कोचिंग सुरू करण्याबाबत जुलै महिन्यात राज्य आणि केंद्र सरकारच्या परवानगी नंतर सुरू करण्याबाबत निर्णय होणार आहे.

Unlock 1.0 तिसरा टप्पा

यामध्ये मध्ये कोरोना संसर्ग परिस्थिती पाहून विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे, मेट्रो, चित्रपटगृह, स्विमिंग पुल, सार्वजनिक कार्यक्रम हॉल, व्यायाम शाळा, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, बार, सार्वजनिक, राजकीय, धार्मिक, मनोरंजन कार्यक्रम परवानगी मिळू शकते.

आंतरराज्यीय वाहतूक करण्यास परवानगी आहे. मात्र, एखादं राज्य अशा वाहतुकीस परवानगी नाकारू शकते

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजटि्वटर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Biz news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.