एक प्रेम पत्र: तिला न मिळालेलं
प्रिये,
***(नाव लिहू शकत नाही कारण तुझें कुणी नाव वाचले तर जगाला कळेल तू कोण आहेस आणि तु फक्त माझी आहेस. त्यामुळे तुला जगापासून लपवण्याचा हा एक माझा बालिश प्रयत्न आहे) पत्रास कारण की, तुझी खुप आठवण येतेय म्हणून लिहित आहे. काहीच बदलल नाही. काहीच बदलत नाही. जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून आत्ता पर्यंत मी फक्त तुलाच पाहतोय. कुठ काय बदललंय या मधल्या काळात? पहिल्या वेळेस बघितलेलं तेव्हा “माझे तुझ्यावर प्रेम आहे” अस सांगायचं होत. पण आज आठ वर्ष झालीत पण अजूनही ते वाक्य तुला सांगायचं राहून गेलय.
माणसाचा काळ बदलत जातो म्हणतात. माझ्यात तर काहीच बदल झाला नाही. तेव्हाही तुला चोरून बघायचो आणि आजही तसच चोरून बघतो. आजचा दिवस उद्या काल होतो. आणि उद्याचा दिवस आपला भविष्यकाळ. माझा आजचा दिवस फक्त आज पुरताच मर्यादित राहिलाय. दिवसांसोबत प्रेम बदलत. पुढची व्यक्ती बदलते. पण माझ प्रेम मात्र तेवढेच आणि तुझ्या पुरतच राहिलंय. काहीच कस बदलत नाही माझ्या आयुष्यात? आजचा दिवस संपताना मी तुझी एक झलक आठवत बसतो. उद्याचा दिवस कुणी बघितलाय? पण तरी उद्याच्या दिवशी तुला पुन्हा चोरून बघून दिवसभर तुला आठवत बसतो. रोज-रोज हेच तर चालू आहे माझ्या आयुष्यात.
प्रेम करायचं माझ चुकल का मी निवडलेली व्यक्ती चुकली हेच मला आता समजेना. अस म्हणतात, माणूस चुकला कि त्याच पुढच सगळ आयुष्य हे चुकतच जात. मीही चुकलो तुझ्याबाबतीत आता अस मला वाटतय. आता अस वाटतय तुझ्या बाबतीत मी जी सगळी स्वप्न बघितलीत ती मी विसरून जावीत. येणाऱ्या उद्याच्या दिवसाची भविष्याशी सांगड घालावी. जेवढ आत्ता पर्यंत तुझ्या पायात मरत आलो आता थोड माझ्या साठी मी जगुन घ्याव अस वाटत. मग माझ्या या नव्या आयुष्यात तू असू किंवा नसो पण मला जगत राहायचं मी तुला तेव्हा विसरलो असेन अस नको समजू. मला कोण दुसर मिळाले म्हणून मी नवे प्रेम केले असे समजू नको. एकदाच होत प्रेम ते मी केलय फक्त तुझ्यावर…. भविष्यात तुला ही माझी सवय लागेल (बहुतेक) माझ्यासारखं तुला हि वेड्यागत प्रेम होईल. तेव्हा मी आणि माझ प्रेम काय आणि कोण होत हे हि समजायला लागेल. पण तेव्हा मात्र माझ्याकड येऊ नकोस. कारण, तेव्हा मी माझ्या आयुष्याची नवीन सुरवात केली असेन.
तुझ्या सुरुवातीला मी तुझ्या आयुष्यात दखल दिली नाही आणि उशिरा सुरु केलेल्या मी माझ्या आयुष्यात तेव्हा तुसुद्धा दखल देऊ नकोस. भविष्याची स्वप्न रंगवताना लोक प्रेम हि कुठेतरी सजवून ठेवतात. मीही आता माझ्या आयुष्याची स्वप्न रंगवेन. पण हे सगळ करताना माझ्या आजच्या प्रेमाच्या भूतकाळाला मी नक्की विसरेन. पण बंद केलेल्या या आठवणींच्या पुस्तकाला मात्र मी तुझच नाव देईन. सगळ्या आठवणी मी मोकळ्या रीत केल्या तरी तू माझ्या मनात कायम राहशील. जीवनाची या माझ्या सुरुवात तूच आहेस. आणि या आयुष्याच्या निर्मितीसाठी प्रेरणा हि तूच आहेस हे कायम लक्षात ठेवीन. आणि काय बोलायचं *** ? मी तुझ्यावरती जेवढ प्रेम केले तितके अजून मी कुणावर केले नाही. बसस…..! तू मला खूप खूप आवडतेस. माझे तुझ्यावर प्रेम करणे हा माझा छंद आहे आणि तो कधी कमी होणार नाही. यासाठी हे कधीही न लिहू शकलेलो प्रेम पत्र….तुझ्यासाठी
लेखक: अजिंक्य भोसले
संपर्क: 7558356426
©PuneriSpeaks
कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.
दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणाऱ्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
चंद्र: ग्रहण मांग समाजाचे | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks
छत्रपती शिवाजी महाराज यांच आवडत गाणं | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks
उरल काय आहे? True Love | मराठी लेख | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks
शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील १० विशेष गुण…
शिक्षणातून आलेला छकीचा स्वाभिमान | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks
ख़ुप छान