झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा हे कोळसा घोटाळा प्रकरणात दोषी आढळले आहेत. दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले असून त्यांना चांगलाच धक्का दिला आहे.
यूपीए सरकारच्या कार्यकाळात हा कोळसा घोटाळा प्रचंड प्रमाणात गाजला होता. घोटाळ्यासंबंधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा हाथ असल्याचा विरोधकांनी तेव्हा सूर आवळला होता. मात्र मधू कोडा हे या प्रकरणात दोषी आढळले आहेत. त्यांच्यासह इतर चारजणांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. याआधीच निवडणूक आयोगाने मधू कोडा यांच्यावर निवडणुकीच्या खर्चाचा हिशेब न दिल्याप्रकरणी कडक कारवाई केली होती. ३ वर्षे निवडणूक लढवण्यावर त्यांच्यावर बंदी टाकलेली आहे, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते.
मधू कोडा हे २००६ मध्ये झारखंडचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. कोडा यांच्या राजकीय कारकिर्दिची इंनिंग ‘ऑल झारखंड स्टुडंट युनियन’च्या कार्यकता म्हणून झाली होती. मधू कोडा हे काही काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही सक्रिय होते. बाबूलाल मरांडी यांच्या सरकारमध्ये त्यांनी पंचायत राज मंत्रिपद सांभाळले होते.
२००५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं त्यांना तिकीट दिले नसल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत जिंकले. या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील अर्जुन मुंडा सरकारला समर्थन देत सरकार स्थापन केले होते.
©PuneriSpeaks