मधु चंद्र: कमी वयातले बालपण | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

0
मधु चंद्र: कमी वयातले बालपण | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

मधु चंद्र

मधुरा, सुंदर गोड मुलगी आणि अशा सुंदर मुलीला तो लाडान “मधु” म्हणायचा आणि त्याच नाव चंद्रविलास. पण ती त्याला प्रेमान “चंद्र” म्हणायची. या दोघांची जोडी म्हणजेच ‘मधु चंद्र’,  तोसुद्धा चांगला गोरापान दिसायला होता.

गुप्त विषय असलेल्या विषयावर लेख का लिहिलाय अस तुम्हाला वाटेल पण. एवढ्या खोलगट विषयात हात का घातला यासाठी आधी वाचा मग ठरवा. तर हा लेख आहे अस म्हणता येणार नाही एकप्रकारे गोष्टच म्हणावी लागेल. गोष्ट आहे प्रेमाची म्हणल्यावर यात दोन पात्र आहेतच. तर… मधु चंद्र
आता हे मला कुणी सांगितल अस वाटत असेल किंवा उगीचच कायतरी मी लिहिलंय अस वाटत असेल तर थांबा आधीच सांगतो हि कथा पूर्ण पणे खरी आहे.

मधु दहावीच्या वर्गात शिकत होती. रोज *** पेठेतूनच मधल्या वाटेने जवळ पडत म्हणून शाळेला आणि ज्यादा तासवर्गाला जात असे. रोज जाता जाता या मधु ला रोज तिच्याकडे बघणारा गोरापान माणूस ( मुलगा ) मावा खात खात आपले लाल दात दाखवत उभा दिसायचा. पहिल्या पहिल्यांदा तीन लक्ष नाही दिल पण पेठेतला तो मुलगा–माणूस म्हणजेच आपला हिरो “चंद्र.”

देवी चौकात राजवाड्यावर विसावा नाका कन्याशाळा पेठेतल किराणा दुकान, जिथ जिथ ती जात तिथ तिथ तो दिसू लागला. आणि नजरा चुकवणे, नंतर नजर चोरून स्वतच पुढ जाऊन त्याला बघणे आणि नंतर हसून हिंट देणे असे चालु झाले. पण बोलायची हिम्मत दोघातही नव्हती. मधु होती सोळा वर्षाची नुकतीच तरुण वयात आलेली तरुणी आणि तो अठ्ठावीस वर्षाचा तरुण वय संपत आलेला चंद्र. रोजच बघणे हा पराक्रम दोघांचा लोकांपासून चोरून-लपवून सुरु होता.
नंतर एक दिवशी (फ्रेन्डशिप डे) ला दुपारी वर्गात तास सुरु होता. मधु ला तिच्या मैत्रिणीने खुणावले. त्या सरशी मधु ने खिडकीतून बाहेर बघितले. न्यू इंग्लिश स्कूलच्या दारातल्या खांबाला एक मुलगा तीन चार फ्रेन्डशिप बँड एकमेकांना गाठ मारून मग मधुकडे बघून हसत खांबाला ती बँड बांधतो. तिची मैत्रीण आणि मधु विचारांच्या जगात हरवून जातात भानावर येईपर्यंत तो निघून जातो. घंटा वाजते आणि मधली सुट्टी होते. त्या दोघी वेळ न घालवता दप्तरात पुस्तक ही न भरता तशाच खाली येतात. मधु ते फ्रेन्डशिप बँड काढून स्वतःजवळ ठेवते.

मधुचंद्र

आणि मग त्याचं हे प्रेम ‘आय लव्ह यु’ न बोलताच पुढ सरकत.

एकच आठवडा झाला असेल या नात्याला, त्याने कासला जाऊ म्हणून तिला नेले. तीन ही घरी थाप मारून चंद्रच आपल्याला महत्वाचा म्हणून त्यासोबत निघून जाते. तिला प्रेम माहित होत, पण शारीरिक प्रेम? कदाचित नाही.
आणि तेच झाल. कास पठाराच्या झाडीत जाऊन दोघे बसली. बोलता बोलता शरीराचा शरीराशी संबंध आला, कमी वयात तोल गेला आणि मग दोघे घरी आले.
दहावीच्या वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर होता राज्यशास्त्र आणि भूगोलचा. आणि तिच्या पोटात दुखायला लागल. तिला न्यायला तो आलेला. दोघे दवाखान्यात गेले आणि कळाले की ती तीन महिन्याची गरोदर आहे.
त्याने आपण मुल पाडूयात असे सांगतील. डॉक्टर ने सांगितल मुलगा आहे नका पाडू, लोकं तरसतात मुलासाठी आणि त्या मुलीची पोटातली पिशवी अतिशय नाजूक आहे. आता मुल पाडलं तर नंतरच्या वेळी समस्या येतील. नाही ऐकल त्याने आणि ती ही त्याच्यापुढे हरली. डॉक्टरने तर नकार दिलेला. काहीतरी करून त्यांनी एका बाबाचा सल्ला घेऊन ते बाळ स्वताच्या (चंद्र) शेतात पाडलं. आणि तिथच ते बाळ तीने आणि त्याने पुरले.

मधुचंद्र

आज त्या बाळाला पुरून चार वर्ष झालीत. त्याची मला आठवण झाली म्हणून त्या बाळासाठी मी हा लेख लिहिला. आणि त्या नंतर तीने शाळा तर सोडाच पण प्रेम नावाचा एक अक्षर ही काढला नाही. बहुदा बाळाचा शाप त्या चंद्र ला लागला म्हणून चंद्रविलासच अजूनही लग्न झाले नाही. मधुरा पुण्याला असते आणि तिला दोन मुली आहेत. आणि तिचा नवरा मुलगा व्हावा म्हणून प्रयत्न करतोय पण तिची गर्भाशयाची ताकद संपलीय. किंवा असेही असेल की पुन्हा त्या मुलाला मरणाची भीती वाटत असेल.

लेखक : अजिंक्य भोसले

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

More:

प्रेमाची शप्पथ आहे तुला

मराठा तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

जिव्हार : प्रेम आणि शेवट

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.