माधुरी दीक्षित निर्मित पहिला मराठी चित्रपट लवकरच पडद्यावर

0
माधुरी दीक्षित निर्मित पहिला मराठी चित्रपट लवकरच पडद्यावर

सध्या मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस आलेत असे म्हणायला हरकत नाही.
संजय लीला भन्साळी, जॉन इब्राहिम, प्रियांका चोप्रा आणि आपला मराठमोळा रितेश नंतर आपली मराठमोळी माधुरी दीक्षित लवकरच मराठी चित्रपट निर्मितीत आपले पाऊल टाकत आहे.
तिने नुकतेच याबाबत ट्विट केले असून सर्व सिनेरसिकांच्या उत्सुकता शिगेला पोहचल्या आहेत.

तिच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ननील जयकर हे करणार असून त्यांचा “तेंडुलकर आऊट” हा २०१३ चा चित्रपट गाजलेला होता. चित्रपटाचे लेखन योगेश जोशी यांनी केले असून ते “मुंबई मेरी जान” साठी प्रसिद्ध आहेत.

अजुन चित्रपटाची स्टार कास्ट पक्की झालेली नसून एक घरगुती ड्रामा सारखा चित्रपट असेल. हा चित्रपट २०१८ ला प्रदर्शित होणार असून सर्व रसिक आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहेत. त्यातच माधुरी दीक्षित ने जर एखादा भाग केला तर चित्रपट हिट व्हायला वेळ लागेल असे वाटत नाही.
आपण या चित्रपटासाठी किती उत्सुक आहात आम्हाला नक्की कळवा.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.