पतंजली कोरोना किट ला महाराष्ट्रात परवानगी नाही : अनिल देशमुख

0
पतंजली कोरोना किट ला महाराष्ट्रात परवानगी नाही : अनिल देशमुख
Spread the love

रामदेव बाबा यांच्या पतंजली कोरोना किट (कोरोनिल आणि श्वासारी) ला महाराष्ट्रात बंदी घालण्यात आलेली आहे. बनावट औषध असेल तर याला महाराष्ट्रात विक्रीला बंदी असेल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

याआधी राजस्थान सरकारने या औषधावर बंदी घातलेली आहे. पतंजली कोरोना किट वर महाराष्ट्रात बंदी घालण्यासंदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून याबाबत स्पष्ट वक्तव्य केले आहे.

पतंजली कोरोना किट औषधाबाबत जयपूर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सर्व तपासणी करत आहे. योगी रामदेव यांना बनावट औषधांच्या विक्रीला महाराष्ट्रात परवानगी मिळणार नाही असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

पंतजली योगपिठ ने कोरोना किट लॉन्च केले आणि केंद्र सरकारनं यावर आक्षेप घेतलेला असून औषधाची जाहिरातबाजी बंद करण्यास सांगितले आहे. औषधाबद्दल सरकारला स्पष्ट माहिती देण्यास सांगितले आहे.

बुधवारी पतंजली ने काढलेल्या कोरोना औषधांला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याने याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. आयुर्वेद विभागाकडून केवळ ताप, खोकला व रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या औषधासाठी परवानगी घेतल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे औषधांवर अनेक प्रश्नचिन्ह तयार झाले आहेत.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजटि्वटर आणि इंस्टाग्रामटेलिग्राम वर भेट द्या.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.