अर्थसंकल्पातून पुण्याला काय काय मिळणार? जलद रेल्वे, रिंग रोड बरेच काही वाचा

0
अर्थसंकल्पातून पुण्याला काय काय मिळणार? जलद रेल्वे, रिंग रोड बरेच काही वाचा
Share

महाविकास आघाडी सरकार दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मांडला. पुण्यासाठी या अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत याबद्दल आपण आज जाणून घेऊयात.

पुणे-नगर-नाशिक जलद रेल्वे मंजूर

पुणे-अहमदनगर-नाशिक या शहराला जोडणारी जलद रेल्वे मंजूर करण्यात आली असून यासाठी १६ हजार १३९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हे अंतर २३५ किमी लांबीचे असून यामुळे तिन्ही शहरांना जोडून वाहतूक जलदगतीने होण्यास मदत होईल.

पुणे रिंग रोड अखेर सत्यात उतरणार

पुणे रिंग रोड चे रडगाणे अखेर संपणार आहे. या आठ पदरी रस्त्याची उभारणीसाठी अखेर २६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुण्यातील वाहतूक सुरळीत व्हावी आणि शहरातील वाहतूक कमी होऊन लोकांना जलदगतीने पुणे पार करता यावे यासाठी ही महत्त्वाची योजना कागदावरून सत्यात उतरणार आहे. १७० किमी च्या या रस्त्यासाठी भूसंपादनाचं काम याच वर्षी हाती घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पुणे विमानतळ प्रश्न सुटणार

पुणे शहरात आणखी एक विमानतळ उभारण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे हवाई वाहतूक वाढून पुण्याचे प्रगती जोमाने होईल.

ससून कर्मचारी निवासस्थान

पुण्यातील ससून रुग्णालयात कार्यरत वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी २८ कोटी २२ लाख रुपयांची मंजुरी अर्थसंकल्पात देण्यात आली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग भुयारी मार्ग

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या दोन साडेदहा किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गांसाठी पैशांची तरतूद करण्यात आली आहे. याबरोबर २ किलोमीटर लांबीच्या २ पुलांचा समावेश असून एकूण ६ हजार ६९५ कोटी रुपये प्रकल्पाला मंजूर करण्यात आले आहेत. या मार्गाने घाटात होणारी वाहतूक कोंडी संपणार असून हा मार्ग डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामुळे पुणे-मुंबई प्रवास वेळ अजून कमी होणार आहे.

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ: बालेवाडी

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ राज्यात स्थापन करण्यात आले त्याबद्दल अजित पवार यांनी सांगितले. पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिल्या आहेत.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.