देशसेवेस कर्तव्यतत्पर असणाऱ्या पोलिसांना सर्व महाराष्ट्र वासियांनी अकाऊंट चा डीपी बदलून केला कार्यास सलाम

0
देशसेवेस कर्तव्यतत्पर असणाऱ्या पोलिसांना सर्व महाराष्ट्र वासियांनी अकाऊंट चा डीपी बदलून केला कार्यास सलाम

सध्या महाराष्ट्रात पोलीस दलातील सैनिक दिवस रात्र रस्त्यावर उभे राहून देशसेवा करत आहेत. अनेक पोलिसांना कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागणझाली आहे. त्यामध्ये अनेक पोलीस दलातील सैनिक मृत्युमुखी सुद्धा पडले आहेत.

मुंबई तसेच महाराष्ट्रातील सेलेब्रिटी, राजकारणी, क्रीडापटू यांनी पोलिसांच्या कार्याला सलाम देत मनाचा मुजरा केला आहे. जे काम पोलीस करत आहेत ते खरे देशाचे हिरो आहेत ही भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

यामध्ये सचिन तेंदुलकर, विराट कोहली पासून अक्षय कुमार, अजय देवगन, वरून धवन, माधुरी दीक्षित, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, जहीर खान, सलमान खान, शाहरुख खान, सुनिल शेट्टी, श्रेयस तळपदे, नोरा फतेही, स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी ते गृहमंत्री अनिल देशमुख, जयंत पाटील ते महाराष्ट्रातील अनेकांनी अकाऊंट चा डीपी बदलून पोलिसांच्या शौर्याला सलाम केला आहे.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.