महाराष्ट्र सायबर शाखा सक्रिय, सोशल मीडियावरील अनेकांच्यावर गुन्हे दाखल

1
महाराष्ट्र सायबर शाखा सक्रिय, सोशल मीडियावरील अनेकांच्यावर गुन्हे दाखल

महाराष्ट्र सायबर शाखा सक्रिय झालेली आहे. लॉकडाउन नंतर सोशल मीडियावर खोट्या बातम्या, अफवा व द्वेषयुक्त पोस्ट केल्याबद्दल एकूण १३२ गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र सायबर शाखेने गेल्या २४ तासांत राज्यात एकूण २० एफआयआर नोंद केल्या आहेत. नोंदणीकृत २० प्रकरणांपैकी १४ जातिय तेढ निर्माण करणारे असून ६ कोरोनाव्हायरस संबंधित अफवा आहेत.

गेल्या ५ दिवसात सोशल मीडियावर द्वेषयुक्त भाषण आणि जातिय तेढ निर्माण करणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे आणि एकूण १३२ मध्ये सोशल मीडियावर द्वेषयुक्त भाषणाबद्दल ४९ प्रकरणे नोंदली गेली आहेत. ३५ आरोपींना यामध्ये अटक करण्यात आलेले आहे. त्यातील २८ जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.

महाराष्ट्र सायबर शाखा कडून वारंवार अफवा आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Whatsapp ग्रुप admin यांना सुद्धा सतर्क राहण्याचे पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

  1. हे राजकीय गुंड नेते, मंञी लोक द्वेषयुक्त वक्तव्ये करतात, मग त्यांना अशी वक्तव्ये करन्यासाठी आरक्षण देन्यात आले आहे का?

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.