महाराष्ट्र लॉकडाउन ३० एप्रिल पर्यंत राहणार असल्याचे शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लॉकडाउन जिल्हानिहाय वर्गीकरण
- रेड झोन: १५ पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या रेड झोनमधील जिल्ह्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही.
- ऑरेंज झोन: 15 पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज झोन मध्ये येतील
- हिरवा झोन: एकही रुग्ण नसलेले जिल्हे हरित पट्टयात समाविष्ट होतील.
भगव्या आणि हिरव्या पट्ट्यांतील जिल्ह्यांमध्ये खबरदारीची उपाययोजना करून उद्योग आणि व्यवहार सुरू करण्याचे स्पष्ट संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिलेले आहेत. पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, तसेच सांगली हे जिल्हे रेड झोन मध्ये विभागले गेले आहेत. दरम्यान, कोल्हापूर आणि सातार्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये झाला आहे. तेथील लॉकडाऊन शिथिल होऊ शकतो. सांगली जिल्हा रेड झोनमध्ये गेल्याने जिल्हावासीयांकडून नाराजी वाजत केली जात आहे. ज्या भागात कोरोना बाधितांची संख्या आहे तिथे रेड झोन घोषित करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
[cov2019]
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.