उद्योगांबाबत महत्वाचा निर्णय, मुख्यमंत्र्यांची उद्योजकांसोबत ऑनलाईन बैठक

0
उद्योगांबाबत महत्वाचा निर्णय, मुख्यमंत्र्यांची उद्योजकांसोबत ऑनलाईन बैठक
Share

राज्यात कोरोना संसर्ग वाढत चालल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रमुख उद्योजकांसोबत ऑनलाइन संवाद साधत लॉकडाउन संदर्भात चर्चा केली.

ऑनलाइन बैठकीला उद्योजक उदय कोटक, अजय पिरामल, सज्जन जिंदाल, बाबा कल्याणी, हर्ष गोयंका, निखिल मेस्वानी, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, अपूर्व भट्टाचार्य, हर्ष गोयंका, बोमन इराणी, राजीव रस्तोगी, संजीव बजाज, मनदीप मोरे, इशान गोयल, अमित कल्याणी, अपूर्व देशपांडे, जफर खान, राजेंद्र गाडवे आदी उपस्थित होते.
 

लॉकडाउन बाबत सकारात्मक चर्चा झाली असून सध्या अंशतः लॉकडाउन बाबत उद्योगांना काळजी घेण्याबद्दल सांगण्यात आले आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाई, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख देखील या बैठकीस उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मार्गदर्शक सूचना

  • वाढता कोवीड प्रादुर्भाव पाहता उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यक तेवढेच कामगार बोलवावेत.
  • प्रादुर्भाव रोखण्यासाठी शक्य तिथे कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची तसेच वर्क फ्रॉम होमची व्यवस्था करावी.
  • जो कामगार कोवीड बाधित होईल त्या कामगाराच्या (तो कंत्राटी असला तरी) कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांची रोजीरोटी चालू राहील याची काळजी घ्यावी.

कोरोना विरोधात लढताना एका कुटुंबाप्रमाणे आपण एकत्रितरित्या या संकटाला सामोरे जाऊ आणि त्यावर मात करू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. यात उद्योजकांनी देखील सरकारला सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.