राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र कबड्डी संघाला ११ वर्षानंतर विजेतेपद | Puneri Speaks

0
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र कबड्डी संघाला ११ वर्षानंतर विजेतेपद | Puneri Speaks

हैदराबाद, काचीबाऊली: राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र कबड्डी संघाने अंतिम फेरीत बलाढ्य अशा सेनादलावर मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.

PC: www.deccanchronicle.com

तब्बल ११ वर्षाच्या कलखंडानंतर महाराष्ट्राला हे विजेतेपद मिळाले आहे. महाराष्ट्राच्या तरुण संघाने रिशांक देवाडीगाच्या नेतृत्वाखाली हा सामना ३४-२९ आघाडी घेत जिंकला. रिशांक देवाडीगाने कर्णधार म्हणून खेळलेल्या खेळीचा मोलाचा वाटा महाराष्ट्राला विजयी बनवून गेला.

उपांत्य फेरीत कर्नाटकला हरवून महाराष्ट्राने अंतिम फेरी गाठली होती, अंतिम फेरीत सेनादल विरुद्ध महाराष्ट्र हा सामना कमालीचा एकतर्फी होईल असा कस सगळे बांधत होता. कबड्डीसेनादलाचा संघ हा आक्रमक खेळी आणि तितकाच मजबूत बचाव यासाठी ओळखला जातो. मात्र सर्व अंदाज चुकीचे ठरवत महाराष्ट्र कबड्डी संघाने विजेतेपद पटकावले. कर्नाटकविरुद्ध उपांत्य सामन्यात फारशी चमक दाखवू न शकलेल्या निलेश साळुखेंने पहिल्या सत्रात चांगली सुरुवात केली. यानंतर कर्णधार रिशांक देवाडीगा आणि नितीन मदने यांनी आपली कमालीची खेळी दाखवत अक्षरशः सेनादलाच्या बचावफळीला खिंडार पाडलं. सेनादलाकडून अनुभवी नितीन तोमर आणि अजय कुमार यांच्याकडून फारशी खेळी झाली नाही. या जोरावर महाराष्ट्राने पहिल्या सत्रात १७-१२ अशी आघाडी घेतली होती

मात्र दुसऱ्या सत्रात सेनादलाने चांगली खेळी करत महाराष्ट्राला पिछाडीवर टाकण्याचा चांगला प्रयत्न केला परंतु अखेर सामना संपताना शेवटच्या क्षणाला कर्णधार रिशांक देवाडीगाने अखेरच्या चढाईत ३ गुणांची कमाई करत महाराष्ट्राला विजयी केले.
©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फॉलो करा.

महत्वाच्या बातम्या:

जातीच्या आधारावर देशाचे तुकडे तुकडे झालेले मला सहन होणार नाही : उदयनराजे

८ ते १० पाकिस्तानी सैनिकांना घातले कंठस्नान ; सीमा सुरक्षा दला (BSF) चे पाकिस्तानच्या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर

 

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.