महाराष्ट्र केसरी | Maharashtra Kesari | Maharashtra Kesari Kusti
यावर्षी पुण्यनगरीत मुळशी तालुक्यातील भूगावमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. दोनवेळचा महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, अभिजित कटके, सागर बिराजदार, शिवराज राक्षे यांच्यापैकी महाराष्ट्र केसरी ची मानाची गदा कोण उंचावणार याबाबत सर्वत्र उत्सुकता आहे.
गतवर्षी अभिजित कटके विजयाला गवसणी घालता घालता हरला होता. विजय चौधरीने अभिजितवर मात केली होती. या वेळी तरी अभिजित महाराष्ट्र केसरी होणार का, याबाबत औत्सुक्य आहे. याशिवाय शिवराज राक्षे, तानाजी झुंजुरके, पुण्याचा साईनाथ रानवडे, साताऱ्याचा किरण भगत, महेश वरूटे, कोल्हापूरचा कौतुक डाफळे, माऊली जमदाडे, सोलापूरचा महादेव सरगर आणि दोनवेळा महाराष्ट्र केसरी पटकावलेला सांगलीचा चंद्रहार पाटील हे यावर्षीचे संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत पुढे आहेत.
भूगावमध्ये २४ डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. सर्व कुस्ती शौकिनांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.