कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून जमावबंदी ची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज रविवार २२ मार्च मध्यरात्रीपासून राज्यातील नागरी भागात १४४ कलम लागू करण्यात आले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याप्रकारे संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
“आज ९ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू आहे. अनेकांना तो नंतर संपेल असे वाटेल. पण हा संयम उद्या पहाटेपर्यंत असाच कायम ठेवायचा आहे. त्यासाठी रात्री ९ वाजल्यानतंर बाहेर पडू नका. दोन दिवसांपासून प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढत आहे. ही संख्या आपल्याला थांबवायची आहे. त्यामळे उद्या सकाळपासून मी केवळ मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरच नव्हे तर राज्यातील संपूर्ण नागरी भागात १४४ कलम लावत जमावबंदी नाईलाजाने लावत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आज मध्यरात्रीपासून परदेशातून येणारी सर्व विमानसेवा बंद करण्यात आली आहे. खासगी बस, एसटी, लोकल पूर्णपणे बंद राहणार आहेत. शहरी वाहतूक फक्त जीवनावश्यक सुविधा पुरवणाऱ्यांसाठी सुरू राहणार आहेत. परदेशातून येणाऱ्यांनी एकटं राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. गरज नसताना घराबाहेर पडू नका तसंच जी जी लोकं गेल्या १५ दिवसांमध्ये विदेशातून आली आहेत त्यांना समाजात फिरू नये, त्यांच्या संपर्कात तुम्ही आला असाल तर तुम्हीही समाजात फिरू नका असेही आवाहन त्यांनी केले आहे.
अन्न धान्य चा साठा करून ठेवण्याची गरज नाही. जीवनावश्यक सुविधा सुरू राहणार आहेत. असे मुख्यमंत्री म्हणाले.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
कोरोना विषाणू: महत्वपूर्ण आणि सकारात्मक बाबी
- एसकेएफ कंपनीची ४८ लाखाची फसवणुक, आरोपीस जामीन मंजूर
- गुगलच्या पुण्यातील कार्यालयात बॉम्ब ठेवला आहे …, अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले
- गौतम अदानी आता टॉप 20 मध्येही नाहीत: संपत्ती फेब्रुवारी 2022 मध्ये $ 88 अब्ज होती, सप्टेंबरमध्ये 150, आज $ 61 अब्ज राहिली आहे
- Heart Attack Symptoms in marathi: यामुळे हृदयाच्या नसा होतात ब्लॉक, जाणून घ्या तज्ज्ञांकडून बचावाच्या पद्धती
- बृजभूषण शरण सिंह विरुध्द ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू, काय आहे वाद