महाराष्ट्र लॉकडाउन: असा असेल बुधवार पासूनचा लॉकडाउन

0
महाराष्ट्र लॉकडाउन: असा असेल बुधवार पासूनचा लॉकडाउन
Share

महाराष्ट्र लॉकडाउन ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्यात बुधवारपासून (दि.14) रात्री ८ वाजेपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

बुधवार पासून पुढचे 15 दिवस संचारबंदी (144) लागू करण्यात आली आहे. यात कारण नसताना बाहेर पडता येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कडक निर्बंध लागू करत असल्याची घोषणा केली.

महाराष्ट्र लॉकडाउन मुख्य मुद्दे आणि नियम

  • अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद राहतील.
  • सकाळी 7 ते रात्री 8 या काळात अत्यावश्यक सेवाच चालू राहतील.
  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद न करता फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील.
  • बँका सुरू राहतील. दूरसंचार सेवा आणि त्यांच्याशी संबंधित देखभाल सेवा सुरू राहतील.
  • अधिसूचनाधारक पत्रकारांना मुभा देण्यात आली आहे.
  • पेट्रोल डिझेल विक्री सुरू राहील.
  • हॉटेल, रेस्टॉरंट यांना फक्त होम डिलीव्हरी आणि टेकवे ला परवानगी असेल.
  • कॅम्पसमध्ये कर्मचाऱ्यांची वसाहत असेल आणि तिथल्या तिथे वाहतूक होत असेल, तर त्याला परवानगी असेल.

महाराष्ट्र लॉकडाउन संपूर्ण नियमावली

महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू झाला असून आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विशेष | Savitribai Phule Information in Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती: बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी…..

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.