Maharashtra Lockdown: राज्यात येत्या शनिवारी व रविवारी लॉकडाऊन; नेमका निर्णय जाणून घ्या

0
Maharashtra Lockdown: राज्यात येत्या शनिवारी व रविवारी लॉकडाऊन; नेमका निर्णय जाणून घ्या
Share

Maharashtra Lockdown: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत खूप मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाउन लावला जाणार असून येत्या शनिवारी म्हणजेच १० एप्रिल आणि रविवारी ११ एप्रिल रोजी कडक लॉकडाऊन असेल असे राज्य सरकारकडून घोषित करण्यात आले आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आठवडाभर कठोर निर्बंध लादले जाणार असून त्याबाबतच्या गाइडलाइन्स आजच जारी होण्याची शक्यता आहे. यात लोकलसेवा मात्र सुरू राहणार असल्याचे कळले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली होती. या बैठकीत Maharashtra Lockdown बाबत गंभीरपणे विचार करण्यात आला व त्यानंतर एकमताने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. पुण्यात जसे निर्बंध लावले आहेत तसेच कडक निर्बंध लावण्यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली.

नवाब मलिक यांनी याबाबत सांगितले असून रात्रीपर्यंत नियमावली जाहीर केली जाईल.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.