मराठी हिंदी भाषेचा वाद आता लोकल ट्रेनमध्येही पाहायला मिळालाय. धक्का लागल्याच्या वादातून मराठी तरुणाला परप्रांतीयांनी शिवीगाळ केलीय.
त्यावर मराठी तरुणाने हिंदी कळत नाही मराठीत बोल असं सांगितले असता परप्रांतीय इसमाने मराठी तरुणाला मारहाण केलीय.
मै हिंदी मे ही बोलूंगा जो करना है कर ले असं म्हणत परप्रांतीयाने मराठी तरुणाला मारहाण केलीय. या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाला सिव्हिल रुग्णालयात उपचार करुन सोडण्यात आलंय.
तरुणाने रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, रेल्वे पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे अधिक तपास करत आहेत.
“परप्रांतीय लोक मुंबईला महान बनवितात.. ” नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय विधान केले होते. त्यातच हा नवीन प्रकार घडला आहे. एवढे लोंढे येऊन भाषा बोलण्यावरून जर मारहाण करत असतील तर खरेच हा महाराष्ट्र कुठे चालला हे पाहणे महत्वाचे आहे.
महाराष्ट्रात अनेक ट्वीटरकर मराठी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न करीत असताना या प्रकारावर काय प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर कमेंट मध्ये लिहा.