महाराष्ट्रात रेडी रेकनर दर वाढ, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक वाढ

0
महाराष्ट्रात रेडी रेकनर दर वाढ, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक वाढ
Share

महाराष्ट्र राज्यात रेडी रेकनर दर सरासरी वाढवण्यात आले आहेत. राज्यात एकूण १.७४ टक्के वाढ केलेली आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक वाढ झालेली आहे. पुणे जिल्ह्यात ३.९१ टक्के वाढ झालेली आहे. पिंपरी चिंचवड क्षेत्रात ३.२ टक्के वाढ झालेली आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रात २ टक्के वाढ झालेली आहे.

मुंबई ०.६ टक्के, ठाणे ०.४४ टक्के, नाशिक ०.७४ टक्के, नागपूर ०.१ टक्के, नवी मुंबई ०.९९ टक्के, रायगड ३ टक्के अशी वाढ झालेली आहे. राज्याच्या उत्पन्नापैकी मोठे उत्पन्न दस्त नोंदणी मधून मिळते.

महाराष्ट्र रेडी रेकनर दर वाढ

  • ग्रामीण भागात २.८१ टक्के,
  • प्रभाव क्षेत्रात १.८९ टक्के,
  • नगरपालिका, नगर पंचायत क्षेत्रात १.२९ टक्के वाढ
  • महानगरपालिका क्षेत्रात १.२ टक्के वाढ

रेडी रेकनर दर म्हणजे काय असते?

रेडी रेकनर दर हा स्थावर व जंगम मालमत्ता खरेदीसाठी वापरात आणला जातो. मूल्य दर तक्त्यामध्ये बांधकाम वर्गीकरणासाठी जिल्हा, तालुका, गाव, प्रभाव क्षेत्र, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद यानुसार आपापले स्वतंत्र दर निश्चित करत असतात. दरवर्षी हे दर बदलले जातात. दरवर्षी एप्रिल मध्ये हे दर बदलले जातात.

येत्या १२ सप्टेंबर पासून हे नवीन दर लागू होणार आहेत. यामुळे घर किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारला रेडी रेकनर दर वाढवल्याने उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.