महाराष्ट्र कोरोना: पुण्यात कोरोना पॉसिटीव्ह चे एकूण ९ रुग्ण, अजून वाढण्याची शक्यता

0
महाराष्ट्र कोरोना: पुण्यात कोरोना पॉसिटीव्ह चे एकूण ९ रुग्ण, अजून वाढण्याची शक्यता

पुण्यात कोरोना संसर्ग झालेले नऊ रुग्ण झाले आहेत. महाराष्ट्र कोरोना चे मधील रुग्णांची संख्या १२ वर पोहचली आहे. पुण्यातील पती-पत्नी दाम्पत्य दुबई फिरून एक मार्च रोजी पुण्यात परतले होते. ट्रॅव्हल एजन्सीमार्फत दाम्पत्य दुबई पर्यटनासाठी गेले होते.

कोरोना विषाणू: महत्वपूर्ण आणि सकारात्मक बाबी

एक तारखेला ते जेव्हा पुण्यात आले तेव्हा दोघांच्यातही कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. त्यांना त्रास सुरू झाल्याने हे दाम्पत्य तपासणीसाठी नायडू हॉस्पिटलमधे गेले. त्यांचे सॅपल्स ‘पॉझिटीव्ह’ आढळले आहेत. त्यांच्या जवळच्यांची तपासणी केल्यानंतर त्यांच्या मुलीसह, त्यांना पुण्याला घेऊन येणारा वाहनचालक आणि त्यांच्यासोबत असणारा पर्यटक यांना कोरोना व्हायरस ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोना व्हायरस रोगप्रसार

त्यांच्यासोबत संपर्कात आलेल्यांची चाचणी केल्यानंतर अजून तिघांना कोरोना विषाणू ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आठ वर पोचली आहे. मुंबई मध्ये सुद्धा दोन जण कोरोना विषाणू बाधित सापडले आहेत. पुण्यात अमेरिकेहून आलेल्या एकाची चाचणी ११ मार्च रोजी करण्यात आली होती. त्यालाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पुण्यातील कोरोना व्हायरस लागण झालेल्यांची संख्या ९ वर पोहचली आहे. नागपूर मध्ये एकजण सापडला आहे. सध्या महाराष्ट्र कोरोना संख्या एकून १२ वर पोचली आहे.

दुबई वरून आलेले दाम्पत्य कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने ज्यांच्यासोबत दुबईला गेलेल्या ४० जणांच्याही चाचण्या करण्यात येत आहेत. त्याचबरोबर कोरोना पॉझिटीव्ह आढळलेले हे पती-पत्नी मागील आठ दिवसांमध्ये ज्यांच्या संपर्कात आले असतील, अशा सर्वांचा शोध घेत असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्व रुग्णांना नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेतलेली असून त्या सर्वांच्यावर आरोग्य विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. तथापि, नागरिकांनी घाबरुन जाण्याची काहीही कारण नाही, असे शासकीय प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

नायडू हॉस्पिटल मध्ये डॉक्टर भेटायला येत नसल्याची तक्रार

अनेक रुग्णांकडून डॉक्टर तपासणी साठी येत नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. एकदाच डॉक्टर ब्लड प्रेशर तपासून गेले असून पुन्हा फिरकले नसल्याचे रुग्णांकडून तक्रार करण्यात येत आहे. नर्स सहाय्यता करत असून डॉक्टर भेटायला येत नसल्याची तक्रार होत आहे. जेवणाची व्यवस्था देखील व्यवस्थित नसल्याचे अनेकांनी सांगितले आहे. मनोरंजनाची काहीही व्यवस्था नसल्याने अनेकांनी दिवस झोपण्यात आणि मित्रांशी दूरध्वनीवरून बोलण्यात घालवला.

भारत कोरोना संख्या

भारतात कोरोना झालेल्यांची एकूण संख्या ७७ पेक्षा अधिक झाली आहे. भारतात अजून एकही मृत्यू कोरोना मुळे झालेला नाही. केरळ मधील ३ जण कोरोना रोगातून यातून बरे झाले आहेत.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

आपल्या समाजाला न कळलेले संभाजी महाराज…

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.