#मराठीतशपथ : महाराष्ट्रातील खासदारांना मराठीतच शपथ घेण्याची ट्विटर करांची मागणी

0
#मराठीतशपथ : महाराष्ट्रातील खासदारांना मराठीतच शपथ घेण्याची ट्विटर करांची मागणी

#मराठीतशपथ लोकसभा निवडणुक २०१९

महाराष्ट्रातून निवडून आलेल्या सर्व खासदारांनी मराठी भाषेततच शपथ घ्यावी अशी मागणी ट्विटरवर जोर धरत आहे.

ट्विटरवरील नेटीझन्सकडून #मराठीतशपथ या हॅशटॅग वर अनेकांनी आपले मत मांडत मराठीचा आग्रह केला आहे. दक्षिण भारतातील खासदार बहुदा आपापल्या भाषेत शपथ घेतात. मराठी भाषा वाढीसाठी आणि त्याच्या प्रचारासह संवर्धन व्हावे यासाठी सर्व मराठी ट्विटर कर या मागणीवर ठाम आहेत.

मराठी भाषा ही जगातील जुन्या भाषांपैकी आहे. हिंदी भाषिकांच्या प्रभावाखाली मराठीची गळचेपी होत असल्याने मराठी भाषिकांनी या मागणीचा जोर वाढवला आहे
मराठी भाषिक महाराष्ट्रातील खासदारांचे शपथविधी मराठीत का असू नयेत? महाराष्ट्रातील खासदारांनी मराठीतच शपथ घ्यावी, असा आग्रह ट्विटर केला जात आहे.

तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे अशीच मागणी मराठी खासदारांनी सुद्धा करावी अशी मागणी काही नेटिझन्सनी केली आहे.

शिवसेनेचे खासदार मराठीत शपथ घेणार

शिवसेना गेले दहा वर्ष मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. मराठी सारख्या अभिमानास्पद भाषेतूनच आपण खासदारकीची शपथ घेणार आहे असे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केले आहे. शिवसेना मराठी अस्मितेवर चालणारी संघटना असल्याने मराठीसाठी खासदार कायमच आग्रही राहतील.

#मराठीतशपथ मराठी ट्विटर करांचा आग्रह
1.

2.

3.

4.

आपल्याला काय वाटते आम्हाला नक्की कळवा…

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

अभिजात भाषा दर्जा म्हणजे काय? #अभिजातमराठी

मराठी ट्विटरकरांनी चालवलाय #माझाक्लिक Hashtag

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.