कोण होणार आमदार! राज्यपाल नियुक्त आमदार साठी १२ जणांची यादी राज्यपालांकडे सादर

0
कोण होणार आमदार! राज्यपाल नियुक्त आमदार साठी १२ जणांची यादी राज्यपालांकडे सादर
Share

गेल्या अनेक दिवसांपासून कोण होणार आमदार अशी चर्चा सुरू आहे. राज्यपाल यांच्याकडून विधान परिषद सदस्य नियुक्ती करण्यात येते. यासाठी महाआघाडी कडून १२ जणांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. या नावांसाठी मंत्रिमंडळ बैठक होऊन अंतिम १२ नावे निश्चित करण्यात आली आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत १२ जणांची यादी सुपूर्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस ४, काँग्रेस ४ आणि शिवसेना ४ अशी नावे सादर केली गेली आहेत.

सायंकाळी परिवहन मंत्री अनिल परब, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेत ही यादी सादर केली. राज्यपाल कोट्यातून १२ जण विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात येणार आहे

राज्यपाल नियुक्त आमदार यादी

काँग्रेस आमदार यादी

  1. सचिन सावंत
  2. रजनी पाटील
  3. मुजफ्फर हुसैन
  4. अनिरुद्ध वणगे – कला

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार यादी

  1. एकनाथ खडसे
  2. राजू शेट्टी
  3. यशपाल भिंगे – साहित्य
  4. आनंद शिंदे – कला

शिवसेना आमदार उमेदवार

  1. उर्मिला मातोंडकर
  2. नितीन बानगुडे पाटील
  3. विजय करंजकर
  4. चंद्रकांत रघुवंशी

“राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी यादी राज्यपालांना दिली आहे. मुख्यमंत्र्यांचं पत्र आणि मंत्रिमंडळ ठराव यासह कायदेशीर बाबी नमूद करुन राज्यपालांना विनंती पत्र दिलं आहे. सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करुन यादी सोपवली आहे, त्यामुळे राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करतील,”

परिवहन मंत्री अनिल परब

“राज्यपाल यादी मंजूर करतील की, नाही हा जर तरचा प्रश्न आहे. त्यावर आताच भाष्य करणं योग्य नाही. आम्ही सर्व बाबींची पूर्तता करून यादी दिली आहे. त्यामुळे राज्यपाल त्यावर शिक्कामोर्तब करतील अशी आशा आहे,”

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.