महेंद्रसिंह धोनी: भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार निवृत्त

0
महेंद्रसिंह धोनी: भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार निवृत्त
Spread the love

भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

एक वर्षापासून क्रिकेटपासून दूर असलेल्या भारताचा दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. सैनिकी स्टाईलमध्ये इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन त्याने याची घोषणा केली. धोनीने आपल्या संपूर्ण प्रवासाचा एक व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की संध्याकाळी 7.29 पासून त्याला निवृत्त समजले जावे. शुक्रवारी धोनी आयपीएल साठी चेन्नईला पोहोचला आणि शनिवारी तो जिममध्येही दिसला होता.

त्याच्या निवृत्तीच्या अनेक बातम्या येत होत्या पण अखेर भारताच्या यशस्वी कर्णधार आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे.

मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात न्यूझीलंडशी उपांत्य फेरीत झालेल्या पराभवानंतर धोनी क्रिकेटपासून दूर होता. त्यावेळी तो घरगुती सामनेदेखील खेळला नाही आणि सैन्यासह प्रशिक्षणासाठी गेला होता. तो टी -२० विश्वचषकात दिसणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत होता.

महेंद्रसिंह धोनी आयपीएल खेळणार !

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे, पण तो आयपीएल खेळतच राहील. काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले होते की, धोनी आयपीएल २०२० आणि २०२१ आयपीएल खेळत राहील आणि शक्य झाल्यास २०२२ मध्येही धोनी खेळताना दिसेल.

महेंद्रसिंह धोनी ने निवृत्ती चा प्रसिद्ध केलेला व्हिडिओ

धोनी पाठोपाठ फलंदाज सुरेश रैना ने देखील निवृत्तीची घोषणा केली आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.