बहुमत चाचणी म्हणजे काय? कर्नाटक विधानसभेत कसे होणार मतदान?

0
बहुमत चाचणी म्हणजे काय? कर्नाटक विधानसभेत कसे होणार मतदान?

बहुमत चाचणी म्हणजे काय?

कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यानंतर राज्यपाल मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देतात. विधानसभेचं विशेष सत्र बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावलं जाते. बहुदा राज्यपाल सभागृहात सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेचे निमंत्रण देतात. त्यावरून तो पक्ष सत्ता स्थापन करून बहुमत सिद्ध करू शकतो. निवडून आलेल्या सर्व आमदारांपैकी सभागृहात उपस्थित असलेले किती आमदार मतदान करतात, यावर बहुमत चाचणीचा निकाल ठरतो. मतदान करायचं की नाही, याचा सर्वस्वी अधिकार आमदारांना असतो. आमदारांनी मतदान केलं, त्याच निकषावर बहुमताचा आकडा ठरतो.

मतदान घेण्याची पद्धत

बहुमत चाचणीसाठी आवाजी पद्धतीने, हात उंचावून किंवा गुप्त पद्धतीने मतदान घेतले जाते. मतदान कोणत्या पद्धतीने घ्यायचं हा निर्णय राज्यपालांचा असतो.

भाजपसमोरचे पर्याय?

भाजपकडे निवडून आलेले १०४ आमदार आहेत. इतर ३ आमदारांनी भाजपला मतदान केले तरीही भाजपकडे ११२ हा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी जागा कमी पडतील. भाजपच्या दाव्यानुसार काँग्रेसच्या सात लिंगायत आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. काँग्रेसच्या सात आमदारांनी पाठिंबा दिल्यास एकूण बहुमताचा आकडा 114 होईल. मात्र भाजपचा हा दावा Anti-defection law च्या विरोधात आहे.

या परिस्थितीमध्ये सभागृहात अविश्वास ठराव पास करायचा असेल, तर काँग्रेसच्या त्या सात आमदारांना गैरहजर रहावे लागेल. जर काँग्रेसच्या त्या सात आमदारांनी राजीनामा दिला तर विधानसभेत 215 आमदार उरतील. यानंतर बहुमताचा आकडाही घटून 108 वर येईल. मात्र तरीही भाजपला एक आमदार कमी पडणार आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

खऱ्या आयुष्यातील नटरंग गणपत पाटील…..!!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या सुवर्ण ट्रॉफीवर संस्कृत मध्ये काय लिहिले आहे?

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.