कोरोना प्रतिबंधासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये 8 दिवस लॉकडाउन कडक करा- अजित पवार

0
कोरोना प्रतिबंधासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये 8 दिवस लॉकडाउन कडक करा- अजित पवार

“वाढणारे कोरोना रुग्ण आणि त्यामुळे वाढणारा मृत्यूदर पाहता पुणे, पिंपरी चिंचवड येथे लॉकडाऊन कडक करावा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी कुठल्याही परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढता कामा नये याची काळजी घेण्यास सांगितले.

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथे वरील निर्देश दिले.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.

त्यांनी संबंधित विभागांनी केलेल्या उपाययोजना व कार्यवाहीबाबत माहिती जाणून घेतली. ते म्हणाले, पुण्यात वाढणारे कोरोना बाधित रुग्ण ही चिंतेची बाब आहे. कुठल्याही परिस्थितीत हे रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून लागेल ती मदत आम्ही देण्यास तयार आहोत.

पोलीस प्रशासनाने पाहिजे तर कडक धोरण अवलंबवावे. त्यासाठी आठ दिवस कडक लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. यासाठी नागरिक निश्चितच सहकार्य करतील. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्यसेवा अत्यंत तत्पर आणि सक्षम करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

पुढे ते म्हणाले, ससून रुग्णालयाच्या नवीन अकरा मजली इमारतीची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्हा नियोजन समितीमधून 25 टक्के निधी खर्च करण्याचे अधिकार शासनाने यापूर्वीच दिले आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कन्टेन्मेंट झोन परिसरात कडक निर्बंध घालण्यात यावेत. या भागातील नागरिकांना वारंवार ये- जा करता येणार नाही. त्याचबरोबर या भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहे व अन्य परिसरात स्वच्छेतेची विशेष दक्षता बाळगावी.

फ्लू सदृश लक्षणे आढळल्यास तात्काळ तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. रॅपिड टेस्टद्वारे संभाव्य रुग्ण शोधण्यावर भर द्यावा. हॉटस्पॉट असणाऱ्या ग्रामीण भागातही कडक निर्बंध अवलंबवावे लागणार आहेत. कोल्हापूर, पिंपरी चिंचवडमध्ये तयार करण्यात आलेल्या ॲपच्या धर्तीवर पुण्यातही असा उपक्रम राबवावा.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी प्राचार्यांना संस्थेत जाण्यासाठी परवानगी देणे आवश्यक आहे, अशी सूचना राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.