Manache Ganapati: पुण्याचे ५ मानाचे गणपती

0
Manache Ganapati: पुण्याचे ५ मानाचे गणपती

Manache Ganapati Pune: मानाचे गणपती पुणे

सार्वजनिक गणपती उत्सवाची धुमधाम नुकतीच सुरू होणार असुन पुण्यात मानाचे गणपती (Manache Ganapati) दर्शनासाठी गर्दी होताना दिसत आहे.
लोकमान्य टिळक यांनी १८९३ साली लोकांनी एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध लढावे यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायला चालू केले.
पुण्यात याची सुरुवात झाली. मानाचे गणपती कोणते हे बहुतेक जणांना समजत नाही त्यासाठी आम्ही आपणासाठी माहिती घेऊन आलोय.

१. कसबा गणपती (मानाचा पहिला गणपती)

कसबा गणपती (मानाचा पहिला गणपती)
कसबा गणपती (मानाचा पहिला गणपती)

कर्नाटकातील इंडी येथून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने, कसबा गणपतीची स्थापना केली. शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांनी देऊळ बांधले.
शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत. म्हणून या गणपतीला ’जयति गणपति’ असे म्हणले जाते.
या गणपतीला पुण्यात प्रथम पूजेचा व ग्रामदैवताचा मान आहे.

२. तांबडी जोगेश्वरी (मानाचा दुसरा गणपती)

तांबडी जोगेश्वरी (मानाचा दुसरा गणपती)
तांबडी जोगेश्वरी (मानाचा दुसरा गणपती)

श्री. तांबडी जोगेश्वरी गणपती मानाचा दुसरा गणपती, तांबडी जोगेश्वरी हे पूण्याचे ग्राम दैवत आहे. पुरातन काळातील हे मंदिर असून स्वयंभु आहे.

३. गुरुजी तालीम (मानाचा तिसरा गणपती)

गुरुजी तालीम (मानाचा तिसरा गणपती)
गुरुजी तालीम (मानाचा तिसरा गणपती)

गुरुजी तालीम हा मानाचा तिसरा गणपती, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक अशी गुरुजी तालीम गणपतीची ख्याती असून पूर्वी बुधवार पेठ मध्ये तालीम मध्ये बसवण्यात येत होता पण सध्या या गणपतीची स्थापना लक्ष्मी रस्त्यावर गणपती चौकात बसवण्यात येते. भिकू शिदे आणि उस्ताद नलबन या दोघांनी या गणपती मंडळाची सुरवात केली. म्हणूनच हा गणपती हिंदू मुस्लिम एक्येचं प्रतिक मानला जातो.

४. तुळशीबाग गणपती (मानाचा चौथा गणपती)

तुळशीबाग गणपती (मानाचा चौथा गणपती)
तुळशीबाग गणपती (मानाचा चौथा गणपती)

श्री. तुळशीबाग गणपती मानाचा ४ था गणपती, याची स्थापना १९०१ साली करण्यात आली असून गणपतीसाठी जवळपास ८० किलोचे चांदीचे आभूषणे आहेत. फायबर ची मूर्ती बसवण्यासाठी सुद्धा या मंडळाची ख्याती आहे.

५. केसरीवाडा गणपती (मानाचा पाचवा गणपती)

केसरीवाडा गणपती (मानाचा पाचवा गणपती)
केसरीवाडा गणपती (मानाचा पाचवा गणपती)

लोकमान्य टिळकांनी १८९३ साली केसरी वाडा म्हणजेच गायकवाड वाडा इथे प्रथम गणपतीची स्थापना केली. छोटी पण सुबक मूर्ती अशी अशी या गणपतीची ख्याती असून गणपती मूर्तीमागे लोकमान्य टिळकांची मूर्ती आहे. इथेच केसरी वर्तमानपत्रांची छपाई कारखाना आहे.

आपण आम्हाला मानाच्या गणपती चे फोटो पाठवू शकता @Punerispeaks वर…

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

History of PUNE: पुण्याचा इतिहास, असे घडले पुणे…..!

वाहतुकीचे नियम तोडताय, मग आपल्याला पासपोर्ट मिळणार नाही, पुणे पोलिसांची नवीन मोहीम

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.