आईला हवा सर्वात जास्त पगार: मानुषी छिल्लर

0
आईला हवा सर्वात जास्त पगार: मानुषी छिल्लर

Miss World २०१७ जिंकणाऱ्या मानुषी छिल्लर नी फायनल मध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नाला असे काही उत्तर दिले आहे की प्रत्येक भारतीयाची मान उंच होईल.
तिला विचारले असता की, कोणत्या व्यवसायात सर्वात जास्त पगार हवा आणि का??
तिने असे काही उत्तर दिले की सर्व स्तब्ध झाले
पहा तिची पूर्ण सफर..

तिने आईला सर्वात जास्त पगार हवा असे म्हणले आहे, का याचेही उत्तर तिने दिले आहे. यावरूनच ती Miss World का झाली याची प्रचिती येते.

भारताची 21 वर्षीय मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर केला आहे. तिने दक्षिण अफ्रिका, वियतनाम, इंडोनेशिया आणि फिलिपिन्सच्या स्पर्धकांचा पराभव करुन हा किताब पटकावला.

भारताची 21 वर्षीय मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर केला आहे. तिने दक्षिण अफ्रिका, वियतनाम, इंडोनेशिया आणि फिलिपिन्सच्या सौंदर्यवतींना मागे टाकत हा किताब पटकावला.

चीनमध्ये झालेल्या मिस वर्ल्डच्या स्पर्धेसाठी जवळपास 130 देशातून सौंदर्यवतींना सहभागी झाले होते. 2016 मधील मिस वर्ल्ड प्यूटो रिकोची स्टेफनी डेल वेलीने विश्व सुंदरीचा मुकुट मानुषीच्या डोक्यावर घातला.

20 वर्षांची मानुषी छिल्लर ही मुळची दिल्लीची रहिवासी असून ती मेडिकलची विद्यार्थिनी आहे.

1966 पर्यंत आशियातील कोणत्याही महिलेला मिस वर्ल्डचा किताब मिळाला नव्हता. पण 1966 मध्ये मेडिकलची विद्यार्थिनी असलेल्या रिता फारिया हिने सर्वात पहिला हा बहुमान मिळवला.

यानंतर तीन दशकांनी म्हणजे 1994 मध्ये ऐश्वर्या रायने पुन्हा इतिहास रचत मिस वर्ल्ड हा किताब पटकावला. ऐश्वर्यानंतर अनेक भारतीय सौंदर्यवतींनी हा किताब आपल्या नावावर केला. यामध्ये डायना हेडन (1997),  युक्ता मुखी (1999) आणि प्रियंका चोप्राने 2000 मध्ये हा किताब पटकावला होता.

मानुषी छिल्लरचा अल्प परिचय

मानुषीचा जन्म 14 मे 1997 रोजी झाला. तिचे वडील मित्रबसू व्यवसायाने डॉक्टर असून, सध्या दिल्लीतील इनमास इन्स्टिट्यूटमध्ये सहाय्यक संचालक पदावर कार्यरत आहेत. तर तिची आई नीलम इब्मास कॉलेजमध्ये बायोमॅट्रिक्सची प्राध्यापिका आहे.

25 जून 2017 मध्ये मानुषीला फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2017 ने गौरवण्यात आलं होतं. ती अशियातील पहिली विश्वसुंदरी रिता फारियाला आदर्श मानते.

मेडिकलच्या विद्यार्थिनीसह ती एक उत्तम कुचिपुडी नृत्यांगना देखील आहे. तिने प्रसिद्ध कुचिपुडी नर्तक राजा आणि राधा रेड्डी तसेच कौशल्या रेड्डी यांच्याकडून कुचिपुडीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं आहे.

जो इतिहास प्रियांका चोप्राने १७ वर्षांपूर्वी रचला त्याची पुनरावृत्ती शनिवारी एफबीबी कलर्स फेमिना मिस इंडिया मानुषी छिल्लरने ‘मिस वर्ल्ड २०१७’चा मुकुट मिळवून केली. हा बहुमान मिळवणारी ती पाचवी भारतीय सौंदर्यवती आहे. शनिवारी चीनमध्ये रंगलेल्या भव्य सोहळ्यात मानुषीने भारताला विजेतेपद मिळवून दिले. मिस वर्ल्ड २०१६ स्टेफनी डेल वॅलने मानुषीला मुकुट घातला.

जगातील सगळ्यात जुनी आणि मानाची ही सौंदर्य स्पर्धा जिंकल्याचा विश्वास बसत नसल्याचे मानुषी चीनहून सांगते. २० वर्षीय ही सुंदरी हरियाणाच्या सोनिपतची रहिवाशी आहे. ती सध्या मेडिकलचे शिक्षण घेत आहे. दिल्लीपासून मिस वर्ल्ड २०१७पर्यंतचा तिचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. मानुषीच्या या यशात फॅशन आणि ग्लॅमर क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मिळालेले मार्गदर्शन फार महत्त्वाचे ठरते. मानुषी एफबीबी कलर्स फेमिना मिस इंडिया २०१७ आहे. पुढे जगभरातील १२१ स्पर्धकांमध्ये रंगलेल्या विश्वसुंदरीच्या या स्पर्धेत मानुषीने बाजी मारली. विश्वसुंदरी स्पर्धेत ‘मिस इंग्लंड’ स्टेफनी हिल ही दुसऱ्या तर ‘मिस मेक्सिको’ अॅण्ड्रिया मेझा तिसऱ्या स्थानी राहिली. मिस वर्ल्ड २०१७चे परीक्षण विविध देशांतील तज्ज्ञ मंडळींनी केले आहे.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.