Maratha Armar Day, History of Maratha Naval force मराठा आरमार दिन -२४ ऑक्टोबर १६५७

0
Maratha Armar Day, History of Maratha Naval force मराठा आरमार दिन -२४ ऑक्टोबर १६५७

Maratha Armar Din 24 Oct 1657

मराठा आरमार दिन २४ ऑक्टोबर १६५७ छत्रपती शिवरायांनी आजच्याच दिवशी भारतातील पहिले जहाज निर्मांण करुन सागरी सुरक्षेची मुहुर्तमेढ रोवली.

१६५३ सालापासून औरंगजेब हा दक्षिणेच्या सुभेदारीवर होता आणि तो दक्षिणेतील दोन्ही शाह्या जिंकून घेण्याचा मनसुबा राखत होता आणि क़ुतुबशाही आणि आदिलशाहीच्या प्रदेशात हल्ले चढ़वत होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन्हीकडे आपले संधान बांधले होते पण औरंगजेब आपल्या ही जहागिरीवर स्वारी करेल अशी शंका येताच शिवाजी महाराजांनी जुन्नर व अहमदनगर या मोगली ठाण्यावर हल्ला चढ़वला. इकडे औरंगजेब यास शाहजहान बादशाहचा हुकुम आला की विजापुरशी चाललेले युद्ध थांबवा आणि तह करा, औरंगजेबाला तह करायचा नव्हता पण त्याने आदिलशाहशी तह केला. हा तह आंमलात आणण्यापूर्वीच औरंगजेबाला दिल्लीकडे निघावे लागले कारण शाहजहान बादशाह आजारी होता आणि त्याच्यामागे आपल्याशिवाय दुसरा कोणीही वारसदार नसावा ही औरंगजेबाची अपेक्षा होती.

 

मोगल – आदिलशाह तहाने युद्ध थांबले असले तरी महमद आदिलशाहच्या मृत्युनंतर आदिलशाही दरबारात गोंधळ निर्माण झाला होता आणि याच दोन्ही परिस्तिथिचा फायदा घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही राज्यात मोडत असलेला कोकणचा प्रदेश काबीज करण्याचा निर्णय घेतला आणि पावसाळा संपताच आदिलशाहच्या ताब्यात असणारी कल्याण, भिवंडी ही नगरे आणि त्याच्या आसपासचा मुलुख ही जिंकला. कल्याण, भिवंडी या दोन सागरी किनार्यालगतच्या ठिकाणांचा छत्रपती शिवाजी महाराजांना आरमार उभारणीच्या दृष्टीकोणातून फार उपयोग झाला आणि येथूनच मराठा आरमाराचा पाया रचण्यास सुरुवात झाली..

छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण, भिवंडी आणि आसपासचा मुलुख जिंकल्याची इतिहासात नोंद असलेली तारीख आहे २४ ऑक्टोबर १६५७.

मराठा आरमार दिनाच्या सर्व इतिहासप्रेमींना हार्दिक शुभेच्छा..

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

कारगिल युद्ध माहिती, कारगिल युद्ध मराठी, कारगिल युद्धाचा इतिहास, कसे झाले कारगिल युद्ध?

शिवाजी महाराज इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज माहिती, अफजलखान वध, शिवराज्याभिषेक, मराठा साम्राज्य, आग्र्याहून सुटका, शिवाजी महाराज वंशावळ

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.