मराठा समाजाला जातीचे दाखले Maratha Caste Certificate देणे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, सेतू कार्यालयात सुरू झाले आहे.
मराठा जातीचा दाखला कसा काढायचा? संपूर्ण प्रक्रिया Maratha Caste Certificate Process
राज्य सरकारने मराठा समाजाला 13 टक्के आरक्षण कायदा लागू केलेला आहे. विधीमंडळात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. उच्च न्यायालयात सुद्धा मराठा आरक्षण ला मंजुरी देण्यातआलीआहे. राज्यपालांच्या सहीनंतर हा कायदा 1 डिसेंबरपासून राज्यात लागू झाला आहे. मराठा समाजातील मुलामुलींना मराठा जात प्रमाणपत्र कसे काढायचे हा प्रश्न पडलेला आहे. मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी खालील खालील प्रक्रिया प्रमाणे जावे.
१. मराठा जातीचा पुरावा काढा | Maratha Caste Proof
- सर्वप्रथम तुमच्या नावापुढे “मराठा” जात उल्लेख असणारा इयत्ता पहीली ते इयत्ता बारावी पर्यंतच्या कोणत्याही एका वर्गातील तुमचा शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) काढा.
- जर तुम्हाला Leaving Certificate दाखला मिळाला नाही किंवा तुम्ही महाविद्यालयात शिकत असाल तर तिथुन बोनाफाइड सर्टिफिकेट Bonafide Certificate काढा.
13 ऑक्टोबर 1967 चा जातीचा पुरावा | 13 Octomber 1967 Maratha Caste Proof
तुमच्या वडिलांचा 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्यापुर्वी जन्म झाला असेल तर त्यांच्या दाखल्यावर “मराठा” अशी जात नमुद असलेला खालीलपैकी कोणताही एक पुरावा घ्या.
- पहीली ते बारावी पर्यंतचा शाळा सोडल्याचा दाखला (ओरीजनल किंवा डुप्लीकेट) किंवा आधीच काढला असेल तर अशा दाखल्याची सत्यप्रत शिल्लक असेल तर ती घ्या.
- जन्म-मृत्यू नोंदीचा महसुल अभिलेखातील उतारा
- शासकीय-निमशासकीय नोकरीत असल्यास सेवापुस्तकाच्या पहिल्या पृष्ठाचा संबंधित कार्यालयाने जातीची नोंद साक्षांकित केलेला उतारा
- समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले जातीबाबत प्रमाणपत्र.
मराठा जातीचा दाखला नसेल तर? | What to do if Maratha Caste Cerificate not available?
काही कारणाने वडिलांचा जातीचा दाखला उपलब्ध होत नसेल तर, तुमच्या घरात 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्यापुर्वी जन्म झालेले तुमचे भाऊ, बहीण, चुलते, आत्या, आजोबा किंवा इतर रक्त नाते संबंधातील व्यक्ती यापैकी कोणीही असेल तर त्याची “मराठा” अशी जात नमुद असणारा वरीलपैकी कोणताही एक पुरावा घ्या.
२. रहिवासी व ओळखीचा पुरावा घेणे | Residence Certificate
रेशनकार्ड: आपले रेशनकार्ड घेऊन आपल्या भागातील तलाठी कार्यालयात जा. आपले रेशनकार्ड दाखवुन तलाठ्याकडुन तुमच्या नावाचा रहीवासी दाखला घ्या.
किंवा
लाईट बिल किंवा कर आकारणी पावती
मतदान ओळखपत्र/पैन कार्ड/ड्राइविंग लाइसेंस/कॉलेज ओळ्खपत्र/आधारकार्ड
अशा प्रकारे रहिवासी व ओळखीच्या पुराव्यासाठी तुमच्याकडे पुढील कागदपत्रे तयार ठेवा.
३. तहसीलदार कार्यालयातून जातीचा दाखला काढणे.

1) तुमच्या जातीचे, रहिवासी व ओळखीचे पुरावे घेऊन तहसीलदार कार्यालय मधे जा.
2) तेथुन जातीच्या दाखल्यासाठी आवश्यक असणारा अर्ज घ्या. अर्ज व्यवस्थित भरुन आवश्यक तेथे तुमची सही करा. अर्जावर 10 रु. किंमतीची तिकीटे/कोर्ट फी स्टँप लावा.
मराठा जात प्रमाणपत्र साठी पुढीलप्रमाणे कागदपत्रे जोडा
- पुर्ण भरलेला व तिकीटे लावलेला अर्ज
- रेशनकार्डची सत्यप्रत
- रहिवासी दाखला
- तुमच्या जातीच्या पुराव्याची सत्यप्रत
- 13 ऑक्टोबर 1967 च्या जातीच्या पुराव्याची सत्यप्रत
- साध्या कोऱ्या कागदावर जातीबाबत व वंशावळीबाबत तुमचे स्वतःचे सत्य प्रतिज्ञापत्र व त्यावर 5 रु. चे तिकीट/कोर्ट फी स्टँप
अ) अर्जदार सज्ञान असल्यास स्वतःने केलेले प्रतिज्ञापत्र
ब) अर्जदार अज्ञान असल्यास त्याचे आई-वडिल किंवा कुटुंबातील सज्ञान पालकाने अर्जदाराच्या नावाने केलेले प्रतिज्ञापत्र.
४. मराठा जात प्रमाणपत्र कार्यालयीन प्रक्रिया | Maratha Caste Certificate Procedure
- हा पुर्ण भरलेला व आवश्यक कागदपत्रे जोडलेला अर्ज घेऊन सेतुमधे जा.
- सेतुमध्ये अर्ज व त्यावरील माहिती अचुक भरली आहे का ते तपासुन घ्या.
- शिक्के मारलेल्या अर्जावर व प्रतिज्ञापत्रावर सक्षम प्राधिकाऱ्याची सही घ्या.
- सही झाल्यानंतर तुमचा अर्ज सेतु मधे जमा करा.
- अर्ज जमा केल्यानंतर त्याची पोचपावती/टोकन घ्यावे. सदर टोकन वर तुमचा जातीचा दाखला मिळण्याची तारीख दिली जाते. हे टोकन जपुन ठेवावे म्हणजे प्रमाणपत्र मिळेपर्यंत त्याचा फायदा होईल.
मराठा जातीचा दाखला मिळेपर्यंत हे टोकन शालेय कामांसाठी चालू शकते.
विवाहित मराठा स्त्रियांना मराठा जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
1) विवाह नोंदणी दाखला
2) विवाहपूर्वीचा कोणताही एक जात सिद्ध करणारा पुरावा
3) लग्नपत्रिका किंवा पोलीस पाटील दाखल
कशी वाटली माहिती, आपल्या मित्रांना मराठा जात प्रमाणपत्र प्रक्रिया कळण्यासाठी हा लेख नक्की शेअर करा. अजुन काही माहिती असल्यास आम्हाला नक्की संपर्क करा.
©PuneriSpeaks
अशाच अनेक अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटर आणि इंस्टाग्राम आम्हाला नक्की फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
देशाचे पहिले नागरिक राष्ट्रपती, तुमचा नंबर किती?
रहस्य शिवाजी महाराज यांच्या बेमतलब मृत्यूचं | Shivaji Maharaj Death Reason in Marathi
I have school leaving certificate .but it’s not mention on it for Caste -Maratha.what is to be done now?
Maratha cast validation document and prosess
Maratha cast validation document and prosess.validity
Jar 1967 cha konich nasel Tr Kay karaych
माझ्या मुली साठी मराठा जातीचे प्रमाणपत्र पाहिजे आहे , पण माझे दत्तक पत्र झाले आहे त्या मुळे माझ्या दत्तक वडिलांचे एक सुद्धा पुरावे नाहीत , माझ्या दत्तक आई बाल विधवा होती , तर मला व माझा जन्म 1969 चा आहे तर मी माझे जन्म वडिलांकडे म्हणजे माझी बहिण हीचा शाळा सोडल्याचा दाखला जोडू शकतो का , व माझे जुने आडनाव व नवीन आडनाव पण तेच आहे , कृपया मार्गदर्शन करावे . अजय बाबुराव तुपे हडपसर पुणे मोबाईल न 97305096100