मराठ्यांचा राजा ‘शिवा’चा जेव्हा शिवा‘जी’ होतो

0
मराठ्यांचा राजा ‘शिवा’चा जेव्हा शिवा‘जी’ होतो

मराठ्यांचा राजा ‘शिवा’जी….. जात धर्मात अडकवलेला शिवाजी

ज्या काळात माणूस स्वतंत्र माणूस म्हणून जगत नव्हता तर गुलाम बनून चाकरी करत होता. अशात जात-पात-धर्म यांचा लवलेश हि कुठे नव्हता. लोकशाही नव्हती का राजेशाही नव्हती. होती ती फक्त गुलामगिरी. आणि अशात कुणाला वाटल नाही कि कुणी, हि गुलामगिरी मोडून काढावी. इराकी-इराणी मुघलशाहीचा बिमोड करून भारतातली स्व-सत्ता स्थापन करावी.

आणि कुणी विचार केलाच नाही कि आपण जर गुलामी सोडली तर सत्ता गाजवणारी मुघलशाही अधिकार कुणावर गाजवेल? मान्य आहे शिक्षणाचा काहीतरी परिणाम हा आपल्या वैचारिक गोष्टीना प्रगत करतो. पण शिक्षणाचा हक्क त्याकाळी फक्त ब्राम्हण समाजास होता. क्षत्रियाने शिकार करावी. कुणबीने शेती करावी. वेश्याने देहव्यापार आणि ब्राम्हणाने पोथी-पुरणाच्या अभ्यासातून समाजकल्याण कराव…

यातून एक पैदा झाला. शहाजीराजे भोसले. राजाच स्वप्न उराशी घेऊन झटणारा हा माणूस गुलामगिरीतच मृत पावला. पण आपल्या मुलाच्या रुपात त्याने राजाच स्वप्न पाहिलं. मग खऱ्या अर्थान जन्माला आला शिवा नावाचा भोसल्यांचा वंशज.

समाजात चाललेल्या गुलामगिरीला संपवत स्वतः राजा झालेला हा भोसल्यांचा मुलगा. हाताशी कुणबी,महार,मांग,मावळ,ब्राम्हण,मराठे हाताशी घेऊन एक एक किल्ला जिंकत आणि आपल्या सत्तेचा विस्तार वाढवत वयाच्या चव्वेचाळीसाव्या वयात भारताचा छत्रपती शिवा शहाजी भोसले झाला. प्रत्येकाच्या नजरेत शिवाच्या अमाप शौर्याने शिवा बद्दल खूप मोठा कधी न संपणारा आदर पैदा झाला. आणि शिवा भोसले , छत्रपती शिवा‘जी’ राजे भासले झाला.

सत्ता उठली ती मुघलांची, मुस्लीम काफरांची आणि दाह झाला उच्च शिक्षित ब्राम्हण पंडितांचा…. मग लावालाव्या आणि कानाभरणी हे आलेच. कधी काही दगाबाजी झाली. पण मुद्दा माझा हा आहे की, आत्ता इतक्या वर्षाने प्रत्येक जात शिवाजी राजाच्या नावाने बोंब मारते कि मराठ्यांचा राजा शिवाजी. तर मग तुमच्यातला का नाही झाला कोणी तुमच्या जातीचा राजा?

असही मुसलमानी,इंग्रजी,डच,फ्रेंच सारख्या मोठमोठाल्या सत्तेशी लढायला एक राजा आणि त्याच चाळीस पन्नास वर्षाच आयुष्य पूर नव्हत. गरज होतीच अजून काही राजांची त्यांच्या सत्तांची. मग अशात शिवाजी भोसलेला सर्वांनी आपला मसीहा मानून त्याला साथ दिली. त्या साथ दिलेल्या पिढीचे आपण वारसदार आहोत. लक्षात असुद्या.

महाराजांनी स्वताला महाराज म्हणवून घेतल नाही. मला मुजरा करा. मला दागदागिने द्या. माझी पूजा करा काहीच सांगितल नाही. काहीजण म्हणतात की महाराजांच्या पराक्रमी सैन्यात मराठा सैनिक नव्हते, होते ते न्हावी, महार, गुजर, बाकी दलित. मग इतक पराक्रम तुमच्या पुर्वजांत होत तर मग शिवाला हारवून स्वतः राजा व्हायचं होत. पण हि कल्पना कुणी सत्यात साकारली नाही. मुळात मुस्लीम सत्तेतून कोण सुटणारच नाही या विचाराची जनता शिवाजीच्या स्वराज्यात सुखी होती, तिला गुलामगिरीतून सोडवून स्वराज्याचे सुख राजाने दिले होते.

हे चुकल पराक्रमी पूर्वजांच किंवा इतिहासच. पण म्हणून तुम्ही शिवाजीला फक्त मराठ्यांचा राजा अस म्हणून त्यांचा अपमान करू शकत नाही.
विचार करा एक एक मावळ गोळा करून वयाची पन्नासवर्ष झटणारा राजा छत्रपती होतो. शिवा भोसलेचा प्रवास श्री .छत्रपती शिवाजी राजे भोसले पर्यंत येऊन पोचतो. आणि एवढ सगळ होऊन हा मामुली शिवा भोसले छत्रपती शिवाजी राजेभोसले होतो आणि बदल्यात त्यांना उपमा मिळते कोणती तर मराठ्यांचा राजा शिवाजी……..

महाराज जिथे असाल तिथे निट राहा.

लेख विचारपूर्वक लिहिला आहे यात ज्या जातींचा उल्लेख केला आहे तो पूर्वीच्या माणसाना उल्लेखून केला आहे. त्याचा आत्ताशी काहीही मेळ साधून गैरसमज करून घेऊ नये. आणि असेल सवय कुणाला जातिवाद करायची तर त्यास तो मुक्त आहे. त्याला मी काही करू शकत नाही. मी बाजू मांडली आहे तमाम रयतेची. ज्या रयतेचा राजा शिवाजी महाराज आहेत. आभारी आहे.

लेखक: Artista Ajinkya Bhosale
संपर्क: 7558356426

©PuneriSpeaks

कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणाऱ्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

धर्मवीर संभाजी: त्याग हिंदवी स्वराज्यासाठी

संभाजी महाराज आणि पोर्तुगीज लढाई, Sambhaji Maharaj Portuguese War

शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.