Maratha Light Infantry Information | Marathi

0
Maratha Light Infantry Information | Marathi

लाईट इन्फण्टरी हा काय प्रकार आहे, हे लक्षात आले कि समजेल मराठा लाईट इन्फण्टरी (Maratha Light Infantry) काय आहे….

Maratha Light Infantry लाईट इन्फण्टरी म्हणजे आघाडी वरील सैन्याची तुकडी. या तुकडीच कर्तव्य म्हणजे आघाडीला राहून शत्रूला प्रथम अंगावर घेणं. ज्यामुळं शत्रू सैन्याचा आढावा घेणं, शत्रूचा ठाव ठिकाणा शोधणं. छापेमारी करून शत्रूला सळोकी पळो करून सोडणे. सतत छोटे छोटे हल्ले करून शत्रूचा लक्ष दुसरीकडे वेधणे. वेगवान हालचाली करून शत्रूला गोंधळात टाकणे. शत्रूच्या प्रदेशात खोलवर जाऊन हल्ला करून शत्रूला आश्चर्यचकित करून सोडणे. एक प्रकारे मागून येणाऱ्या मोठ्या सैन्या साठी सुरक्षित मार्ग तयार करून देणं. मागून येणाऱ्या सैन्याचा जीव या तुकडीच्या हातात असतो.

लाईट इन्फण्टरीचे सैनिक कधीही एका साचे बंद पद्धतीने हालचाल करत नाहीत. त्याची संख्या कायम सीमित असते जेणेकरून ते शत्रूच्या नजरेत येऊ नयेत. या सैनिकांकडे रसद आणि शस्त्रास्त्र नेहमी सीमित स्वरूपात असतात जेणे करून त्यांना वेगवान हालचाली करता येतील. या तुकडीतील सैनिक काटक चपळ आणि कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यास तयार असतो.

या तुकडी कडे आजून एक महत्वाचा काम असत छापामारीच. कायम छोटे छोटे हल्ले करून शत्रूला बेजार करायचा आणि गुंतवून ठेवायचा. जेणे करून शत्रूला मागून येणाऱ्या सैन्य कडे लक्ष हि देता येऊ नये. ज्यावेळेस मोठ्या सैन्याला तोंड देणे कठीण जाते त्यावेळेस लाईट इन्फण्टरी तोंड न देता पटकन पसार होतं. पण तीच तुकडी वेळ मीळताच पलटवार करून मोठ्या सैन्याची धूळधाण उडवते.
लाईट इन्फण्टरी मध्ये असणाऱ्या सैनिकांना इंग्लिश मध्ये स्किमिंशेर म्हंटलं जातं. Maratha Light Infantry अशाच लाईट इन्फण्टरी  चा भाग आहे.

अशा पद्धतीच्या सैन्यदलाचा उल्लेख प्रथम आढळतो इस पूर्व ४२३ रोम सैन्या मध्ये. त्याकाळी या तुकडी मध्ये असणाऱ्या स्किमिंशेरला खालच्या दर्जाची वागणूक मिळे. त्याला कारण हि तसेच होते, या सैन्याकडे हत्यार कमी असत बऱ्याचवेळा ते दगडाचा वापर करीत, यामुळे या तुकडी मध्ये गरीब घरातील मुलांची भरती जास्त असे. पण याच स्किमिंशेरला प्लेटो नावाच्या तत्वन्याने त्याचा पुस्तकांमध्ये मनाचा स्थान दिला. आणि त्या नंतर हल्ले करून पसार होणारी (hit and run) पद्धत अवलंबणारे हिरो बनु लागले. आणि तिथून पुढे स्किमिंशेरला ला प्रत्येक लढाई मध्ये मानाचं स्थान मिळू लागल. पुढे रोमन साम्राज्यात अशाप्रकारचे सैनिक एकत्र करून एक वेगळं सैन्य उभारला गेलं ज्याला ऑक्सिलीया म्हंटलं जात. या पथकातील सैन्याकडे फक्त एक ढाल आणि एक तलवार असे.

रोमन ऑक्सिलीया

अशाच प्रकारे पुढे ग्रीकांनी थोराकीताई (स्किमिंशेरला) नावाच्या सैनिकांच्या तुकड्या उभ्या केल्या. थोराकीताईकडे फक्त एक भाला एक ढाल आणि एक शिरस्त्राण एवढच युद्धाचं साहित्य असे. पण या तुकड्या मजबूत, चपळ आणि काटक आशा होत्या. आणि त्याच जोरावर ग्रीकांनी साम्राज्य उभा केला.

या पद्धतीचा सर्वात मोठा उपयोग अमेरिकेत गृह युद्धाच्या वेळेला झाला. त्यावेळेस अमेरिकन सैन्याच्या हाती मस्केट नावाची बंदूक अली होती. त्यावेळच्या उपलब्ध हत्यारांपेक्षा या बंदुकीची मारक क्षमता लांबची पाल्याची होती. तेवढीच मस्केट घेऊन अमेरिकन सैन्य छोट्या छोट्या गटात विभागून झाड झुडपात लपून इंग्रजांवर हल्ले करत आणि या हल्ल्याने इंग्रज सैन्य बेजार होऊन माघार घेत.नमूद करण्या सारखी गोष्ट म्हणजे अमेरिकन सैन्य अशा प्रकारचे युद्ध पध्दती मूळ अमेरिकन अर्थात रेड इंडियन लोकांकडून शिकले होते.

नेपोलीयनचे स्किमिंशेरला

पुढे अशाच पद्धतीच्या सैन्याचा उपयोग नेपोलियन ने केला. नेपोलियनचे स्किमिंशेर आघाडीवर राहून शत्रू सैन्यावर छापा मारून हल्ला करून बेजार करत. आणि मागून येणारं नेपोलियनच मुख्य सैन्य अलगत शत्रू सैन्याला गिळत.

Maratha Light Infantry

हा झाला जागतिक इतिहास, आता येऊ मराठ्यांकडे. मराठे तर छापा मारीच्या युद्धात वाकबगार. सटवायने गनिमीकावा मराठ्यांच्या पाचवीलाच पुजलाय आणि सह्याद्रीने खेळता-खेळता मराठ्यांना गनिमी काव्यात तज्ञ बनवलंय. मराठे मूळचे गरीब शेती करून पोट भरणारे. खायला पैसे नाहीत शत्रास्त्रला कुठून आला पैसे. याच अडचणी मुळे कि काय, हाती येईल त्याचा मराठे शत्र बनवून उपयोग करत मग ती लाठी काठी असो, दगड गोटे असो, गोफण असो. हाती शत्र आल्यावर तर काय विचारायचं साक्षात वीरश्री पाहत राहत असे. सभोवतालचा पुरे पूर उपयोग करून घेणं मराठे शिकले किंवा सह्याद्रीने त्यांना मारून झोडून शिकवलं. बापाचं तो त्यांचा मारून झोडूनच शिकवणार . मराठ्यांची पोरं खेळ देखील काय खेळायची सूर पारंब्या आट्यापाट्या हुतूतू या खेळातूनच ते शिकत चकवणं, सभोवतालचा वापर करणं, आणि शत्रूच्या हातावर तुरी देऊन पुढे जाणं.

१८ व्या शतकात फ्रानसीसको बाल्झार नावाच्या चित्रकाराने काढलेलं मराठा योध्याचे चित्र

मराठे युद्धावर जाताना कधीहीत सरंजाम घेऊन जात नसे. मोजके कपडे, मोजकी हत्यारे, मोजका शिधा, या मुळे मराठ्यांच्या हालचाली जलद आणि लांब पल्याचा असायचा. वेळ प्रसंगी जे आहे ते टाकून पळ काढता यायचा.

काही काही मोहिमेत मराठे घोड दौड करताकरता भोजन करत. मराठ्यांचा हल्ला शत्रूला एवढा चकित करे की शत्रू मराठ्यांना भूत समजत. याच्या काही ठळक उदाहरण म्हणजे महाराजांचा लाल महालावर हल्ला, सुरतेचा छापा, संताजी धनाजी चे हल्ले, थोरल्या बाजीरावांची चपळ हालचाल करून शत्रूवर हल्ला करणं.
अशी एक ना अनेक उदाहरणं मराठ्यांच्या इतिहासात उपलब्ध आहेत. त्यामुळं मराठे म्हंटलं कि गनिमीकावा आणि गनिमी कावा म्हंटलं कि मराठे.

आता लक्षात आला असेल मराठा लाईट इन्फण्टरी (Maratha Light Infantry) का आहे ते.

पोस्ट साभार:- अभिजीत वाघ

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

“आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चित्रपटातील गोमू संगतीनं सदाबहार गाणे प्रदर्शित

कारगिल युद्ध माहिती, कारगिल युद्ध मराठी, कारगिल युद्धाचा इतिहास, कसे झाले कारगिल युद्ध?

Maratha Armar Day, History of Maratha Naval force मराठा आरमार दिन -२४ ऑक्टोबर १६५७

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.