मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, रद्द करण्याची कारणे

0
मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, रद्द करण्याची कारणे
Share

मराठा आरक्षण ची आस लावून बसलेल्या मराठा समाजाला आजही न्याय मिळाला नसून सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द करत महाराष्ट्र सरकारला धक्का दिला आहे. अनेक तरुण आरक्षण वर आस लावून बसले असताना हा निकाल मराठा समाजावर अन्याय करणारा ठरणार आहे. आज या निकालाची सुनावणी खंडपीठाने केली.

न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस. अब्दुल नाझीऱ, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट या पाच जणांच्या खंडपीठाने निकाल देत मराठा आरक्षण रद्द केले आहे.

मराठा आरक्षण रद्द करण्याची कारणे?

सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान सांगितले की गायकवाड समितीचा अहवाल अस्वीकारार्ह आहे. मराठा आरक्षण देणं गरजेचं वाटत नसून सध्याच्या परिस्थितीत आरक्षण देणं शक्य नाही. घटनेने लागू केलेली ५०% ची आरक्षण मर्यादा ओलांडण्यासाठी सबळ असे काही सादर करण्यात आले नाही. १९९२ मध्ये इंद्रा सहाणी खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ५० टक्के आरक्षण मर्यादा घालून दिली होती. नऊ सदस्यीय खंडपीठानं हा निकाल दिला होता. इंद्रा सहाणी खटल्याच्या पुनर्विचाराची गरज नसल्याचे खंडपीठाने सुनावणीदरम्यान सांगितले.

मोठ्या बेंचकडे जाण्याची आम्हाला मुभा आहे. पण तिथे जाण्याआधी सविस्तर ऑर्डर आल्यानंतर वकिलांशी चर्चा करुनच निर्णय घेऊ,” “न्यायालयात एक रणनीती लागते. पण दुर्दैवाने मराठा आरक्षणाबाबत कोणीच कारभारी नसल्याने युक्ती आखण्यात आली नव्हती. राज्य सरकारची मराठा आरक्षण देण्याची इच्छा नव्हती असं नाही पण युक्ती चुकली आहे,”

याचिकाकर्ते विनोद पाटील

©PuneriSpeaks

Like us on FB PageTwitter, and Instagram

MORE Funny Memes:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.