मराठा आरक्षण: फडणवीस सरकारच्या आदेशानुसार युक्तिवाद केला नाही, कुंभकोणी यांचा गौप्यस्फोट

0
मराठा आरक्षण: फडणवीस सरकारच्या आदेशानुसार युक्तिवाद केला नाही, कुंभकोणी यांचा गौप्यस्फोट
Share

मराठा आरक्षण स्थगितीवरून आरोप प्रत्यारोप सुरू असून माजी सरकारी वकिल निशांत कटनेश्वरकर यांनी केलेल्या आरोपावर महाराष्ट्र महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या आदेशानुसार मी मराठा आरक्षणाच्या प्रकरणात न्यायालयात युक्तिवाद केलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षण स्थगिती दिल्याने मराठा समाजामध्ये नाराजीचा सूर आहे. अंतिम निर्णय घटनापीठ घेणार असून तोपर्यंत आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. महाराष्ट्र सरकारचे माजी वकील निशांत कटनेश्वरकर यांनी या स्थगितीला महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोश कुंभकोणी यांना सुद्धा जबाबदार ठरवत त्यांच्यावर आरोप केले होते. आरक्षण प्रकरणात युक्तिवाद करण्यासाठी कुंभकोणी एकदाही उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात गेलेले नाहीत. महाधिवक्ता म्हणून या प्रकरणात युक्तिवाद करणं त्यांचं कर्तव्य होते. परंतु, त्यांनी तसे केले नाही त्यामुळे स्थगितीच्या निर्णयाला ते सुद्धा तितकेच जबाबदार असल्याचे कटनेश्वरकर म्हणाले होते.

आशुतोष कुंभकोणी यांनी याबाबत आपली बाजू मांडली आहे. हे सर्व आरोप त्यांनी आरोप फेटाळून लावत स्पष्टीकरण दिले आहे. ‘मराठा आरक्षण प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात फेब्रुवारी २०१९ मध्ये सुनावणी सुरू झाली होती. सुमावणी सुरु होण्याआधी जानेवारी महिन्यात सोलापूर येथे सर्व मराठा संघटनांची बैठक झाली होती. त्यांनी सरकारच्या वतीनं माजी महाधिवक्ता व्ही. ए. थोरात यांना युक्तिवाद करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने या मागणीला मान्यता देत व्ही ए थोरात यांना संधी देण्याची विनंती केली होती. देवेंद्र फडणवीस सरकारच्या या मागणीचा मान ठेवत मी खटल्यापासून दूर राहिलो होतो,’ असे स्पष्टीकरण आशुतोष कुंभकोणी यांनी दिले आहे.

मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकावे यासाठी मी स्वतः अनेक प्रयत्न केले असल्याचे सुद्धा ते म्हणाले.

मराठा आरक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिला आहे. त्यानुसार वर्ष २०२०-२१ साठी मराठा आरक्षन स्थगिती दिलेली आहे. पदव्युत्तर आरक्षण प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने यात बदल केले जाणार नसले तरीही वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये मराठा आरक्षण लागू होणार नाही. मराठा आरक्षणप्रकरणी आता घटनात्मक खंडपीठ पुढची सुनावणी करणार आहे. पुढची सुनावणी होईपर्यंत राज्य सरकारच्या नोकर भरतीमध्ये मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.

राज्यभर मराठा समाजाकडून अनेक आंदोलने होत आहेत.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.