मराठा आरक्षण आंदोलन: औरंगाबादमध्ये १७ वर्षीय तरुणाची आत्महत्या

0
मराठा आरक्षण आंदोलन: औरंगाबादमध्ये १७ वर्षीय तरुणाची आत्महत्या

मराठा आरक्षण आंदोलन

औरंगाबाद फुलंब्री तालुक्यात अवघ्या १७ वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केली आहे. त्याने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडल्याने औरंगाबाद मध्ये तणावाचे वातावरण होते. मराठा आरक्षणासाठीच त्याने आत्महत्या केल्याचा दावा मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याने मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात फुलंब्री तालुक्यात जमले होते.

१७ वर्षांच्या अंकुश हरी म्हस्के या तरुणाने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली असून या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी सांगितले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी संपूर्ण मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलन उग्र स्वरूपात सुरू होते. आंदोलकांनी नांदेड – मुखेड मार्गावरील आलू वडगाव येथे बस पेटवली. उमरी तालुक्यातही बसच्या काचा फोडण्यात आल्याने वातावरण चिघळले होते. नायगाव तालुक्यातही कहाळा येथे आंदोलकांनी बस फोडली तर निळा येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. या आंदोलनाचा फटका नांदेड – वसमत आणि नांदेड – एकदरा या दोन मार्गाला झाला असून वाहतूक व्यवस्था बंद होती.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

मराठा लाईट इन्फण्टरी बद्दलची माहिती

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.