महाराष्ट्रातील पोरांनी यमक जुळणाऱ्या भन्नाट मराठी कविता आपल्या मित्रांच्या जुन्या फेसबुक फोटोवर टाकून टाकून फेसबुक दणाणून सोडले आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकजण घरातच आहेत. यामुळे अनेकजण दिवसेंदिवस नवनवीन गेम खेळत आहेत. याचा फटका थेट फेसबुक संस्थापक मार्क झुकेरबर्ग ला सुद्धा बसला आहे. चक्क फेसबुक संस्थापक मार्क झुकेरबर्ग याच्या जुन्या फोटोंवर सुद्धा मराठी कविता चा रतीब मराठी पोरांनी लावलेला आहे.
घरी वेळ जात नाही म्हणून अनेक जणांनी फेसबुक वर जुन्या फोटोंवर यमक जुळवणाऱ्या मराठी कविता कॉमेंट टाकण्यास सुरुवात केली आहे. या ट्रेण्डचा फटका मार्क ला सुद्धा बसला आहे.
भन्नाट मराठी कॉमेंट वाचायच्यात?
“चॉकलेट असतं डार्क, भाऊंना पाहून पोरी म्हणतात हाच माझा मार्क” यांसारखे यमक जुळवणारे अनेक कॉमेंट फेसबुक संस्थापक मार्क झुकेरबर्ग याच्या जुन्या फोटोंवर झळकत आहेत. काही दिवसांपासून मराठी मिम ट्रेंडिंग वर होते परंतु आता मनोरंजन म्हणून ५-१० वर्षांपूर्वीच्या जुन्या फोटोंवर यमक जुळवणारे कॉमेंट टाकायचा नवीन ट्रेंड आला आहे. यामुळे अनेकांचे जुने फोटो आता फेसबुक टाइमलाइनवर अचानकपणे पहिल्या पानावर झळकू लागलेले आहेत. मार्क झुकेरबर्ग च्या फोटोवरील भन्नाट कॉमेंट बघून हसू आवरत नाही. तरी मार्क झुकेरबर्ग नी २०१५ च्या आधीच्या फोटो वरील कॉमेंट बंद केल्या आहेत. नाहीतर पोरांनी ऊत आणला असता हे म्हणायला हरकत नाही.
मराठी कविता मार्क झुकेरबर्ग च्या फोटो वरील कॉमेंट

वडा वावू वडा वावू वडा वावू वावू

भाऊचा फोटो बघून पोरी म्हणतात,
जीव झाला येडा पिसा


पोरी म्हणतात तूच आमचा हेराफेरितला कचरा सेठ….
अशाप्रकारे अनेक यमक जुळणाऱ्या मराठी कविता मार्क च्या फोटोवर वाढत चालल्या आहेत. आता या भन्नाट मराठी कविता मार्क झुकेरबर्ग ला किती समजतात हे पाहावे लागेल.
आपल्याला कोणती कॉमेंट आवडली आम्हाला नक्की कळवा…
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
कोरोना विषाणू: महत्वपूर्ण आणि सकारात्मक बाबी
Facebook Comments in Marathi, Funny Shayari Comments
- बृजभूषण शरण सिंह विरुध्द ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू, काय आहे वाद
- रोनाल्डो आणि मेसी 3 वर्षानंतर येणार समोरासमोर, गोल्डन तिकीट 22 कोटी रुपयांना विकले : Ronaldo vs Messi
- सुनील शेट्टीचे खंडाळा मधील आलिशान फार्म हाऊस
- Best Pawna Lake Camping For Couples: Top 3 Pawna Camping
- IT क्षेत्रात मंदी येणार?रुपया पडल्याने मंदीचे सावट येणार?