मराठी म्हणी आणि अर्थ, मराठी म्हणी ओळखा

1
मराठी म्हणी आणि अर्थ, मराठी म्हणी ओळखा
Share

दैनंदिन जीवनात आपण बरेचदा मराठी म्हणी वापरत असतो. यासाठी मराठी म्हणी आणि अर्थ आपणासाठी घेऊन आलो आहोत. मराठी म्हणी ओळखा आणि त्यांचे अर्थ आपण समजून घेऊ शकता. संपूर्ण मराठी म्हणींची यादी खाली दिलेली असून मराठी म्हणी व त्यांचे वाक्यात उपयोग समजावून सांगितलेले आहेत.

चोरावर मोरएखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसर्‍यावर कडी करणे
चोराच्या मनात चांदणेवाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात.
पाण्यात राहुन माशांशी वैर करू नयेज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी वैर करून नये.
जळत घर भाड्याने कोण घेणारनुकसान करणार्‍या गोष्टीचा स्वीकार कोण करणार.
ज्याचे खावे मीठ त्याचे करावे निटजो आपल्या वर उपकार करतो त्या उपकार कर्त्याला स्मरण करून त्याच्या यशासाठी प्रयत्न करावेत.
गाढवाच्या पाठीवर गोणीएखाद्या गोष्टीची अनूकुलता असून उपयोग नाही. तर तिचा फायदा घेता यायला हवा.
गाढवापुढे वाचली गीता मूर्खाला केलेला उपदेश वाया जातो.
गाव करी ते राव ना करीश्रीमंत व्यक्ति स्वत:च्या बळावर जे करू शकत नाही ते एकीच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात.
गाढवाला गुळाची चव काय?मुर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.
गरज सरो नि वैद्य मरो आपले काम झाले की उपकार कर्त्याची पर्वा न करणे.

गरजवंताला अक्कल नसते

गरजेमुळे अडलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते.
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाहीदुष्ट व्यक्तींच्या कृत्याने चांगल्या माणसाचं नुकसान होत नाही.
सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगीएकदम अशक्य कोटीतील गोष्ट करणे
गरजवंताला अक्कल नसतेगरजेमुळे अडलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते.
खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशीपरिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा
खर्‍याला मरण नाहीखरे कधी लपत नाही, सत्य मेव जयते!
कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेचकितीही प्रयत्न केले तरी काहीचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही.
कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरीही कडू ते कडूचकिती ही प्रयत्न केला तरीही माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही.
उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नयेकोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
गर्वाचे घर खालीगर्विष्ठ माणसाची कधीतरी फजिती होतेच.
कामापुरता मामा ताकापुरती आजीआपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे.
कर नाही त्याला डर कशालाज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगावयाचे
एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीतदोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविदाने नांदू शकत नाहीत
एका हाताने टाळी वाजत नाहीदोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे.
ऐकावे जनाचे करावे मनाचेलोकांचे ऐकून घ्यावे व मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे.
एका माळेचे मणीसगळीच माणसे सारख्या स्वभावाची. एकसारखीच
एक ना घड भारभर चिंध्याएकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्थवट होण्याची अवस्था.
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंगअतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे
उथळ पाण्याला खळखळाट फारथोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मरतो.
उंदराला मांजर साक्षवाईट कृत्य करतांना एकमेकांना साक्ष देणे.
उडत्या पाखरची पिसे मोजणेअगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे.
इकडे आड तिकडे विहीरदोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती असणे.
उठता लाथ बसता बुकीप्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे.
अळी मिळी गुप चिळीरहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे.
अचाट खाणे मसणात जाणेखाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतात
आलीया भोगाशी असावे सादरकुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
आवळा देऊन कोहळा काढणेक्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.
आपलेच दात आपलेच ओठआपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे.
अंथरूण पाहून पाय पसरावेआपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
असतील शिते तर जमतील भुतेएखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.
आईचा काळ बायकोचा मवाळआईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा
अति शहाणा त्याचा बैल रिकामाजो माणूस फार शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही.
आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळेअपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.
अडला हरी गाढवाचे पाय धरीएखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.
आंधळे दळते कुत्रं पीठ खातेएकानं काम करावं आणि दुसर्‍यांनं त्याचा फायदा घ्यावा.
आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळेअपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.
आधी पोटोबा मग विठ्ठोबाआदी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा.
आईजीच्या जीवावर बाईजी उदारदुसर्‍याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे.
आयत्या बिळात नागोबा
दुसर्‍याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे.
अति तेथे मातीकोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.
अगं अगं म्हशी मला कोठे नेशीस्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे.
आपला हात जगन्नाथआपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.
तोंड दाबून बुक्यांचा मारएखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही बंद करणे.
ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागलावाईट माणसाच्या सहवासामध्ये चांगला माणूसही बिघडतो.
डोंगर पोखरून उंदीर काढणेप्रचंड परिश्रम घेवूनही अल्प यश प्राप्ती होणे.
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाहीकष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही.
झाकली मूठ सव्वा लाखाचीव्यंग गुप्त ठेवणेच फायद्याचे असते.
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाहीमूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही.
तू दळ माझे आणि मी दळण गावच्या पाटलाचेआपले काम दुसऱ्याने करावे आपण मात्र लष्कराच्या भाकरी भाजाव्यात.
असंगाशी संग आणि प्राणाशी गाठदुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो
अति तेथे मातीकोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसान कारक असतो
अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धेनाव मोठे लक्षण खोटे
थेंबे थेंबे तळे साचेदिसण्यात शुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा संचय होतो.
आईची माया अन् पोर जाईल वायाफार लाड केले तर मुले बिघडतात
आयत्या बिळावर नागोबाएखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे.
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळेअपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मासमुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक, अवस्था निर्माण होणे.
आंधळं दळतं कुत्रं पिठ खातंएकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा.
अंथरूण पाहून पाय पसरावेआपली ऐपत पाहून वागावे.
आपल्याच पोळीवर तूप ओढणेफक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे.
आपला तो बाब्या दुसर्याचे ते कारटेस्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे.
उचलली जीभ लावली टाळ्यालादुष्परिणामाचा विचार न करता बोलणे
उठता लाथ बसता बुक्कीप्रत्येक कृत्याबद्दल आदर घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे.
उसाच्या पोटी कापूससद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संपत संतती.
एक ना धड भाराभर चिंध्याएकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था.
एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नयेदुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये.
ऐंशी तेथे पंचाऐंशीअतिशय उधळेपणाची कृती.
एका कानावर पगडी, घरी बाईल उघडीबाहेर बडेजाव पण घरी दारिद्र्य
करीन ते पूर्वमी करेन ते योग्य, मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे.
करुन करुन भागला, देवपूजेला लागलाभरपूर वाईट कामे करून शेवटी देवपुजेला लागणे.
काठी मारल्याने पाणी दुभंगत नाहीरक्ताचे नाते मोडू तोडू म्हणता तुटत नाही.
काकडीची चोरी फाशीची शिक्षाअपराध खूप लहान; पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे.
काना मागुन आली आणि तिखट झालीश्रेष्ठ पेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे.
कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसतेपूर्वग्रह दूषित दृष्टी असणे.
कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणीमहान गोष्टींबरोबर शुल्लक गोष्टींची तुलना करणे.

जर आपल्याला एखाद्या मराठी म्हणी चा अर्थ माहिती करून घ्यायचा असेल तर खाली कॉमेंट बॉक्स मध्ये म्हण लिहा. आम्ही मराठी म्हणींचा अर्थ नक्की समाविष्ट करू.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.