परकीय लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा सैन्याबद्दल केलेल्या नोंदी…

0
परकीय लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा सैन्याबद्दल केलेल्या नोंदी…

छत्रपती शिवाजी महाराज खुद्द लष्करी मोहिमेत भाग घेत असत त्यावेळी ते अतिशय साधेपणाने राहत आणि वागत असत, सूरत मोहीम व कर्नाटक मोहिमेत अनेक यूरोपीय लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिले होते. या परकीय लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा सैन्याबद्दल नोंदी केलेल्या आहेत..

फ्रेंच गव्हर्नर मार्टिन लिहतो ” महाराजांच्या सैन्यात फारसे सामानसुमान नव्हते अथवा स्त्रियाही नव्हत्या. मराठा फ़ौजेत फारसा तोफखानाही नव्हता त्यामुळे त्यांना आपल्या फ़ौजेच्या चपळ हलचाली करणे शक्य होत असे आणि शत्रुस सावध होण्यास व लढण्यासाठी सिद्ध होण्यास अवधी मिळत नसे ”

डॉ. फेअर हा यूरोपीयन मराठा सैन्याबद्दल नोंद करतो ” गाणेबजावणे, पोशाखाचा भपका, ऐट इत्यादी पासून मराठे अलिप्त असतात. कष्टमय जीवित, वेगाने दौड़ करण्याची सवय आणि सुखाकडे दुर्लक्ष या कारणामुळे शिवाजीचे हे लोक लष्करी पराक्रम करण्यास अधिक लायक आहेत ”

डॉ फ्रायर हा यूरोपीयन प्रवासी मराठा लष्कराबद्दल लिहतो ” शिवाजीच्या सैनिकांना हालअपेष्टांची सवय होती ते सुखासीन बनलेले नव्हते त्यामुळे कोणत्याही साहसी आक्रमणाला ते कायम तयार असत ”

सूरत मोहिमेच्या दरम्यान तर छत्रपती शिवाजी महाराज एका झाडाच्या सावलीत उभे राहून मोहिमेचे नियोजन करत होते अशी नोंद आढ़ळते.

मराठा लष्कर किती सक्षम आणि प्रभावी होते याबद्दल परकीय इतिहासकार व्हिंन्सेंट स्मिथ लिहतो ” अकबराचा जर मराठ्यांच्या चपळ सैन्याशी तोंड देण्याचा दुर्दैवी प्रसंग आला असता तर त्याचा पणतू औरंगजेब याच्यावर पुढे जो प्रसंग ओढ़ावला त्याहुन वेगळे काही घडलेच नसते ..

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन ऐतिहासिक वाचण्यासाठी:

शिवजयंती सोहळा: शिवराय आणि त्यांचे आधुनिक मावळे

ज्ञानकोविंद शंभूराजे आणि छत्रपती परिवार !

संभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.