नोकरीवाला नवरा नको ग बाई
आज लग्नाच्या वयात आलेल्या प्रत्येक मुलीला एकच सांगणे आहे. आज घडीला महाराष्ट्रात सर्वच समाजात सरकारी आणि इंजिनियर नोकरीला असणाऱ्या वराची नवरदेवाची संख्या खूपच कमी आहे नोकरी वाला नवरा पाहिजे म्हणून आज अनेक मुलीची वये 28।30।32।पर्यंत पोहचली आहेत. तेव्हा मुलींनो आपल्या घरातील आई वडिलांना भावाला समाज गावातील मंडळी पाहुणे काय म्हणत असतील याचा विचार करा. उगाच मुलाचा Flat पाहिजे हे पाहिजे करत अडू नका.
नोकरी वाल्या पेक्ष्या शेतकरी मुलगा अधिक चांगला, तो जन्मभर आई बापाला सांभाळून शेती करून बगला बांधून, चारचाकी गाडी घेवून, सोन नाणं घेवून तुम्हाला सुखात ठेवु शकतो. पण आता कुठल्याच सरकारी असो अथवा पुणे मुंबई ची नोकरी असो, नोकरीवाला आयुष्यात कधीच मुलीला सुखी ठेवू शकणार नाही, नाही कारण शहरात खर्चच भागत नाही, मग शिल्लक काय राहणार.
ही नोकरीची पोर फक्त तुम्हाला साडी चांगली घेतील, सिनेमाला नेहतील, भाडोत्री खोली घेतील आणि गावाकडे कधी यायच झालं तर एस टी ने बायकोला घरी पाठवून हॉटेलात खातील, पण जन्मभर नोकरी केली तरी या नोकरी वाल्या मुलाजवळ शिल्लक काहीच नसणार आणि पुन्हा वयाची पन्नाशी ओलांडली की या नोकरी वाल्याना आजार खूपच होतात आणि मग शिल्लक फंड त्यातच संपूण जातो, पुन्हा याला दारूचं व्यसन जडते आणि जमवलेले सगळे संपून जाते मग Heart Attack च्या श्वासा पर्यंत सुखी राहतो.
त्याच गाव त्याची मित्र मंडळी पै पाहुणे त्याची माया करतात आयुस्यांच्या शेवटी कुटुंबातील सगळ्या साठी भरपूर कमावून ठेवतो म्हणून नवऱ्या मुलींनो अजून वेळ गेलेली नाही वेळीच विचार करा अन नोकरी वाला पती न करता गडगंज मोठा बागायतदराचा मुलगा अथवा चांगला मोठ्ठा व्यवसाय वाला मुलगा निवडा पण नोकरी नोकरी वाला करून जिंदगी बरबाद करू नका. हे मानवाचा जन्म परत परत नसतो मुलींनो एकदाचा निर्णय घ्या, केला तर शेतकरी अथवा व्यवसाय वाला च नवरा करीन पण नोकरी वाल्या साठी लग्न थांबवणार नाही म्हणजे नाही
धन्यवाद
आपले म्हणणे आम्हाला नक्की कळवा….
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
Sharad Pawar Wiki & Net Worth: Age, Biography, Wife, Family, Political Back Ground Details
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विशेष | Savitribai Phule Information in Marathi