मातोश्री बाहेर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला मुलीसह अटक

0
मातोश्री बाहेर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला मुलीसह अटक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बाहेर आज गदारोळ पाहायला मिळाला. मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला लहान मुलीसह पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

मातोश्री बाहेर घडलेली घटना

झाले असे की देशमुख नावाचे शेतकरी सकाळी मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. ते आपल्या समस्या घेऊन फाईल सह मुख्यमंत्र्यांना भेटण्यास आले होते. सकाळपासून वाट पाहत असलेले देशमुख यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्याची परवानगी काही मिळाली नाही. त्यांनी भेटण्याची विनंती केल्याने त्यांना भेटण्यास नकार देत पोलीसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेतले.
हा शेतकरी त्याच्या समस्या घेऊन पनवेलहून मुंबईत आला होता. त्याच्यावर कर्जाचा डोंगर असून बँक त्यांची अडवणूक करत असल्याची त्यांची समस्या होती. सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही बँक अडवणूक करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. या संदर्भात समस्या घेऊन देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्री बाहेर आले होते. त्यांच्यासोबत त्यांची आठ वर्षांची मुलगीही होती. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. यावेळी देशमुख आणि त्यांच्या मुलीला थोडी धक्काबुक्कीही झाली.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन लेख वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.