मुख्यमंत्र्यांच्या मी मुख्यमंत्री बोलतोय, जय महाराष्ट्र आणि दिलखुलास या कार्यक्रमाच्या चित्रीकरण आणि जाहिरातबाजीवर सरकारच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याचे उघड झाले आहे.
एकीकडे राज्यावर कर्जाचा डोंगर आहे म्हणायचे आणि दुसरीकडे स्वतःच्या लोकसंवादाच्या कार्यक्रमांवर कोट्यवधींचा खर्च करायचा यावरून मुख्यमंत्र्यांवर चोहोबाजूने टीका होताना दिसत आहे.
मी मुख्यमंत्री बोलतोय वर ABP माझा चा खास रिपोर्ट:
मुख्यमंत्र्यांनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’, ‘जय महाराष्ट्र‘ आणि ‘दिलखुलास‘ या जनतेशी संवाद साधणाऱ्या कार्यक्रमांवर आतापर्यंत जवळपास ४ कोटी ४५ लाखांचा चुराडा झाल्याचे समोर आले आहे.
एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत, राज्याची तिजोरी खाली होत असताना अशा प्रकारचा खर्च केल्याने राज्य सरकार वर टीका होत आहे.
फडणवीसांनी इमेज बनवण्यासाठी मी मुख्यमंत्री बोलतोय हा TRP नसलेला कार्यक्रम चालू केला.त्यासाठी मंत्रालयात सुसज्ज AC क्रोमा स्टुडीओ थाटला.त्याचे शुटिंग,स्क्रिप्ट
,देवेंद्रजींचा मेकअप,यासाठी महिन्याला २० लाखाचा चक्काचूर होतो!जाहिरात,प्रसारण सर्व मिळून 4 कोटी 45 लाखाचा खर्च!वा!
धन्य? pic.twitter.com/JVlMLPnJVf— विवेक पाटील (@VivekPatil_) January 17, 2018
@Dev_Fadnavis यांच्या 2 महिन्याच्या कार्यक्रमाच्या खर्चात एक मराठी चित्रपट होतो. त्यामुळे यांनी फिल्म करायला पाहिजे होती. दुसरं म्हणजे यांना कुणी लुटतंय यावर विश्वास ठेवणं कठीण, त्यामुळे हे सरकार कुणाचेतरी खिसे भरत होतं का? हे तपासायला पाहिजे.#Advertising#Maharashtra https://t.co/XUMgOQqkvn
— Abhijit Karande (@abhiasks) January 17, 2018
‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाच्या खर्चावरून आज गोंधळ सुरू आहे. तब्बल 10 लाख रुपये एका एपिसोडचा खर्च दाखवलाय.
याबद्दलची माझी ही 24 ऑक्टोबर 2017 ची….अडीच महिन्यांपूर्वीची बातमी ! https://t.co/2dY1iUZb0h
— amey tirodkar (@ameytirodkar) January 17, 2018
सरकार यावर पुनर्विचार करून अशी उधळपट्टी थांबवेल अशी आशा करूयात.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
More:
Sharad Pawar Wiki & Net Worth: Age, Biography, Wife, Family, Political Back Ground Details
शरद पवार यांच्या कारकिर्दीचा आढावा…..
छत्रपतींचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
मराठा तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
भीमा कोरेगाव येथे झालेला प्रकार अशोभनीय : शरद पवार