मिर्जापुर 2 ट्रेलर: गुड्डू आणि कालीन भैया यांच्यात रंगणार घमासान

0
मिर्जापुर 2 ट्रेलर: गुड्डू आणि कालीन भैया यांच्यात रंगणार घमासान
Share

बहुप्रतिक्षित मालिका मिर्जापुर 2 ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अ‍ॅक्शन, इमोशन आणि ड्रामा ने भरलेल्या या मालिकेची प्रतीक्षा अनेक दिवसांपासून होती. ट्रेलरमध्ये अली फजल, पंकज त्रिपाठी यांसारख्या सिनेस्टार ची अ‍ॅक्शनसह प्रसिद्ध संवाद पाहायला मिळत आहेत.

या सिझन मध्ये शक्ती आणि सूड घेण्यासाठी सुरू असलेली चढाओढ पाहायला मिळेल. सीझन 1 संपल्यानंतर या हंगामाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मिर्जापुर 2 ट्रेलर रिलीजच्या भागातील सूड, कट, नाटक आणि भयानक स्त्री शक्तीच्या थरातून, नवीन कथा, तोफा, अंमली पदार्थ आणि अराजकता अशा अनेक विषयांना हात घालणारी ही मालिका 23 ऑक्टोबर ला प्रदर्शित होणार आहे.

मिर्जापुर 2 ट्रेलर

मिर्जापुर 2 मध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदु, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुगल, हर्ष शेखर गौर, अमित सियाल, अंजुम शर्मा, शीबा चढा आणि राजेश तेलंग यांसारखी तगडी मंडळी आहे. यावेळी विजय वर्मा, प्रियांशु पेंडौली आणि ईशा तलवार यासारखे नवीन कलाकार देखील या मालिकेत आपले वैशिष्ट्य दाखवायला सज्ज झाले आहेत.

आपण या मालिकेसाठी उत्सुक आहात का? आम्हाला नक्की कळवा

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.