MIT ADT Pune: महाराष्ट्र सरकारचा आदेश डावलून MIT ने घातला परीक्षेचा घाट, विद्यार्थी चिंतेत

0
MIT ADT Pune: महाराष्ट्र सरकारचा आदेश डावलून MIT ने घातला परीक्षेचा घाट, विद्यार्थी चिंतेत

MIT ने विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. महाराष्ट्र सरकारने आधीच सरासरी पकडून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासंदर्भात निर्देश दिले असताना MIT व्यवस्थापनाचा वेगळाच कारभार सुरू आहे.

CAA (Comprehensive Assessment Test) आणि OBA ( Oral Based Assessment) अशा दोन्ही पद्धती वापरून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थी चिंतेत असून अचानक काढलेल्या आदेशाने दिवसरात्र Assignment तयार कराव्या लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

महाराष्ट्र शासनाने सरासरी करून उत्तीर्ण करावे असे आदेश असताना MIT व्यवस्थापनाचा वेगळाच कारभार सुरू आहे.

CAA (Comprehensive Assessment Test) म्हणजे काय?

CAA मध्ये विद्यार्थ्यांना Assignment दिल्या आहेत. त्या ठराविक वेळेत पूर्ण करून सॉफ्ट कॉपी आपापल्या विभागाला द्यावी लागणार आहे. कॉलेज सुरू झाल्यानंतर हार्ड कॉपी जमा करणे बंधनकारक आहे.

OBA ( Oral Based Assessment) म्हणजे काय?

OBA मध्ये ऑनलाईन मुलाखत घेतली जाणार आहे. Lab/Seminar/Mini Project विषयांवर आधारित ही VIVA होणार आहे. प्रत्येकाने Zoom डाउनलोड करणे बंधनकारक असून एकावेळी 5 जणांची मुलाखत होणार आहे.

MIT ने परीक्षेचा घाट घातल्याने मुले संभ्रमात असून एवढ्या कमी वेळात Assignment जमा करणे आणि न झालेल्या Lab Practical वर तोंडी परीक्षा दिल्यास अनेकजण अपयशी होऊ शकतात. 8-10 जून पासून OBA सुरू होणार आहेत. त्याबाबत MIT ADT ने वेळापत्रक जारी केले आहेत. कोरोना लॉकडाउन मध्ये MIT च्या अनेक विभागातील शिक्षकांनी ऑनलाईन क्लास घेतले होते परंतु त्याची गुणवत्ता आणि परीक्षेचा अभ्यासक्रम यात तफावत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक विद्यार्थी गावी गेल्याने तेथील इंटरनेट सुविधा खराब आहे त्यामुळे अनेकांना Zoom वर परीक्षा देणे संभव नाही. MIT याबाबत काय करते हे पाहावे लागेल.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजटि्वटर आणि इंस्टाग्रामटेलिग्राम वर भेट द्या.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.