टॉयलेट मध्ये मोबाईल घेऊन जाताय? मग हे नक्की वाचा

0
टॉयलेट मध्ये मोबाईल घेऊन जाताय? मग हे नक्की वाचा

टॉयलेट मध्ये मोबाईल फोन घेऊन जाण्याची अनेकांना सवय असते. ही सवय अनेकांना सोडवत नाही. एकप्रकारे तुम्ही टॉयलेट मध्ये मोबाईल घेऊन जाता म्हणजे गंभीर आजाराला निमंत्रण देऊन येत असतात.

मोबाईल दुष्परिणाम

Side Effects of Using Mobile in Toilet

फोन म्हणजे आपल्यापैकी अनेकांचा जीव की प्राण असतो. उठता बसता, खाता-पिता अनेकांच्या हातात मोबाईल असतो. खरे म्हणावे तर केवळ अंघोळ करतानाच आपल्यापैकी अनेक महाभाग फोन दूर ठेवत असतात. काहीजणांना शक्य झाले तर तिथेही मोबाईल घेऊन जाऊ शकतात. अनेकजण झोपतानाही फोन सोबत घेऊनच झोपतात.

काहीजण चक्क टॉयलेट मध्येही फोन घेऊन जातात. हळूहळू मोबाईलच एक आजार झाला आहे. अनेकांना मोबाईल चे व्यसन लागलेले असते. हे व्यसन सुटता सुटत नाही. भविष्यात मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र सुरू झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

Side effects of using mobile in toilet

एका संशोधनात स्पष्ट झाले आहे की, टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन गेल्यास तुम्हाला विविध आजार होण्याची शक्यता असते. आपल्या घरात सर्वात जास्त किटाणू कोणत्या जागेत असतील तर ते टॉयलेटमध्ये असतात. टॉयलेटमध्ये विविध आजाराला निमंत्रण देणारे किटाणू नेहमीच असतात. जर तुम्ही ज्या पद्धतीने टॉयलेटमध्ये फोन घेऊन बसता त्यात काही किटाणू फोनलाही चिकटण्याची शक्यता असते. कारण तुमचा अस्वच्छ हात आणि फोन याचा फार जवळून संबंध येतो.

तसेच, टॉयलेटमधून बाहेर आल्यावर तुम्ही टॉयलेट साफ केलेला हात तर स्वच्छ करता. पण, फोनचे काय करणार? तो कसा स्वच्छ करणार. प्रत्येकवेळी टॉयलेट वरून आल्यानंतर मोबाईल स्वच्छ करणे शक्य आहे का. टॉयलेट मधून बाहेर आल्यावर मोबाईल वर लागलेले किटाणू जीवजंतू तुम्ही बाहेर घेऊन येत असता. तुम्ही यामुळे स्वतःसह आपल्या परिवाराचे आरोग्य सुद्धा धोक्यात घालत असता.

आपल्या मोबाइल फोनवर किटाणू जीवजंतू प्रजननाची शक्यता जास्त असते. मोबाईल गरम किटाणूंना जगण्यासाठी आणि वाढण्यास एक उबदार वातावरण मिळते. हाच फोन आपण खाताना देखील वापरतो. टॉयलेट मध्ये साल्मोनेला, ईकोली, कॅम्पीलोबॅक्टर, गॅस्ट्रो आणि स्टेफ सारखे जिवाणू आढळतात आणि हे सर्व आपल्याला खूप आजारी बनवू शकतात.

आपल्या घरातील टॉयलेट स्वच्छ तरी असते परंतु जर तुम्ही पब्लिक टॉयलेट मध्ये मोबाईल घेऊन जात असाल तर अनेक रोगांना तुम्ही आमंत्रण देत आहात. म्हणूनच टॉयलेटमध्ये फोन अजिबात वापरू नका.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.